पर्यटन उद्योगात भारत एक प्रमुख शक्ती
MakeMyTrip चे सह-संस्थापक आणि समूह सीईओ राजेश मागो म्हणतात की, ‘’पर्यटन उद्योगात भारत एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत आहे. या अहवालातील माहितीमुळे ट्रॅव्हल आणि हॉटेल उद्योगातील लोकांची मागणी आणि उपलब्ध सुविधा यांच्यातील तफावत कमी होण्यास मदत होईल’’. ते पुढे म्हणाले की, ‘’याचाच अर्थ पर्यटनाला चालना देण्यासाठी योग्य धोरणे बनवणे, भेट देण्यासाठी नवीन ठिकाणे ओळखणे आणि प्रवाशांच्या विशिष्ट आवडी आणि इच्छा पूर्ण करणारे अनोखे एक्सपेरियन्स तयार करणे होय.’’
भारतीय लोक सर्वाधिक प्रवास कुठे करतात?
या अहवालात असेही दिसून आले आहे की, धार्मिक स्थळांव्यतिरिक्त 2019 च्या तुलनेत 2023 मध्ये 3 पेक्षा जास्त ट्रिप करणाऱ्या लोकांच्या संख्येत 25% वाढ झाली आहे. वीकेंडच्या सहलींबद्दल बोलायचे झाल्यास, 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट देण्यासाठी 131% अधिक सर्च झाले आहेत.त्याचप्रमाणे उटी आणि मुन्नार ही देखील वीकेंड ट्रीपसाठी आवडती ठिकाणे आहेत.
2023 भारतीयांनी सर्वाधिक परदेशात कुठे प्रवास केला?
परदेशात जाण्याकडेही भारतीयांचा कल वाढला आहे. अहवालानुसार, दुबई, बँकॉक आणि सिंगापूर ही सर्वात जास्त सर्च केली जाणारी परदेशी ठिकाणे आहेत. याशिवाय, लंडन, टोरंटो आणि न्यूयॉर्क हे सर्वात जास्त सर्च केल्या गेलेल्या देशांपैकी 30% आहेत. 2023 मध्ये नवीन परदेशी ठिकाणांच्या शोधात अनेक पटींनी वाढ झाल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. यामध्ये हाँगकाँग, अल्माटी, पारो, बाकू, दा नांग आणि तिबिलिसी या ठिकाणांचा समावेश आहे.