तेज पोलीस टाइम्स – परवेज़ शेख
शिवाजी रस्त्यावर सापडलेली पावणेचार लाखांची रोकड जमा करताना अधिकारी. शनिवारवाडा गेटवर पावणेचार लाखांची रोकड जप्त
पुणे/कसबा पेठ : शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा गेट नाक्यावर २४ तास पोलिस व प्रशासन यांचे पथक कार्यरत असते. शनिवारवाडा गेट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाचे एसएसटी पथक प्रमुख रमेश पाटील, पीएसआय असगर अली सय्यद, पी.सी. बोराडे, नागरगोजे येथे कार्यरत होते. सोमवारी सकाळच्या सुमारास शनिवारवाडा गेट परिसरात वाहनांची तपासणी सुरू असताना ऑडी कारची (क्र. एमएच १२ एसवाय ९०८१) अडवून झडती घेतली असताना त्यात ३ लाख ८० हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सदर रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने कसबा विधानसभा अंतर्गत शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा परिसर तसेच स्वारगेट परिसरातील नटराज हॉटेल या नाक्यांवर पोलिसांकडून संशयास्पद वाहनांची कसून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये संबंधितांचे गाडी नंबर, नावाची रजिस्ट्ररमध्ये नोंद केली जात आहे.