Redmi Pad SE ची किंमत
Redmi Pad SE च्या ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये आहे. तर ६जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आणि ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मॉडेलची १४,९९९ रुपये आहे. हा टॅब भारतात ग्रॅफाइट ग्रे, लव्हेंडर पर्पल आणि मिंट ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होईल. टॅबलेटची विक्री भारतात Amazon, Flipkart आणि Xiaomi रिटेल स्टोर्सवर २४ एप्रिलपासून सुरु होईल. ग्राहक आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड ट्रँजॅक्शनवर १,००० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळवू शकतात.
Redmi Pad SE चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Pad SE मध्ये ११ इंचाची WUXGA LCD स्क्रीन आहे, जिचे रेजोल्यूशन १,९२०x१,२०० पिक्सल, रिफ्रेश रेट ९०हर्ट्झ, पीक ब्राईटनेस ४०० निट्स आणि पिक्सल डेन्सिटी २०७पीपीआय आहे. टॅबलेट ६नॅनोमीटर ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेटसह आला आहे. यात ८जीबी पर्यंत एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि १२८जीबी ईएमएमसी ५.१ इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. हा अँड्रॉइड १३ आधारित मीयुआय पॅड १४ वर चालतो. या टॅबलेटमध्ये १०वॉट चार्जिंग सपोर्टसह ८,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
कॅमेरा सेटअप पाहता Redmi Pad SE च्या मागे एफ/२.० अपर्चरसह ८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. विशेष म्हणजे फ्रंट फेसिंग कॅमेऱ्याचा वापर टॅबलेट अनलॉक करण्यासाठी देखील करता येतो. कनेक्टिव्हिटीसाठी टॅबलेटमध्ये ड्यूल बँड वाय-फाय, ३.५मिमी हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ ५.० कनेक्टिव्हिटी मिळते. यात एक व्हर्च्युअल अँबीएंट लाइट सेन्सर, अॅक्सेलेरोमीटर आणि एक हॉल सेन्सर देण्यात आला आहे.