एक्सोप्लॅनेटला एलियन्सच्या उपस्थिती
लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, पॅनस्पर्मिया सिद्धांत सूचित करतो की परग्रहावरील जीवन एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर पसरू शकते. शास्त्रज्ञांनी नेहमीच ‘एक्सोप्लॅनेट’ हे एलियन्सच्या अस्तित्वाचे एक स्थान मानले आहे. ‘एक्सोप्लॅनेट्स’ हे असे ग्रह आहेत जे आपल्या सूर्याभोवती फिरत नाहीत तर इतर ताऱ्यांभोवती फिरतात.
एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर पोहोचण्यासाठी उल्केचा वापर
शास्त्रज्ञांनी आतापर्यंत ५ हजारांहून अधिक एक्सोप्लॅनेट शोधले आहेत. त्यांच्या मते, एक्सोप्लॅनेटवर जीवनाचा पुरावा असू शकतो आणि एलियन एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर पोहोचण्यासाठी उल्का वापरू शकतात.
एलियन्सची ओळख पटवणे हे सर्वात मोठे आव्हान
अहवालानुसार, एलियन्सची ओळख पटवणे हे सर्वात मोठे आव्हान असेल. एलियन्स हे आत्तापर्यंत आपण चित्रपटांमध्ये पाहिलेल्यापेक्षा वेगळे दिसू शकतात.अहवालानुसार, एलियन्स पृथ्वीवर आले तर त्यांचा शोध घेण्याऐवजी त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम बघणे गरजेचे आहे. दोन शास्त्रज्ञांनी त्याचा रोडमॅपही तयार केला आहे. एलियन्समध्ये पृथ्वीचा नैसर्गिक समतोल बिघडवण्याची क्षमता असल्यास, त्यांना ओळखणे सोपे होऊ शकते.
रिसर्चचा रिव्ह्यू बाकी
तथापि, या सिद्धांताचे/संशोधनाचे पुनरावलोकन (रिव्ह्यू) करणे बाकी आहे. हा अभ्यास अत्यंत प्राथमिक म्हटला पाहिजे कारण अद्याप एक्सोप्लॅनेटबद्दल फारशी माहिती नाही. शास्त्रज्ञांनी शोधलेल्या 5 हजार एक्सोप्लॅनेटची संख्या किरकोळ असू शकते कारण नवीन शोधलेल्या एक्सोप्लॅनेटची संख्या सातत्याने वाढत आहे.