काय होणार? परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स

हायलाइट्स:

  • अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
  • मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना
  • मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात होणार चौकशी

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील मनी लॉण्ड्रिंगच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं (ED) राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. परब यांना येत्या मंगळवारी (२८ सप्टेंबर) ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणात अनिल परब यांना तब्बल २० कोटी रुपये मिळाल्याचा आरोप निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यानं केला होता. त्यांच्या आरोपांनंतर अनिल परब हे ईडीच्या रडारवर आले आहेत. वाझेच्या जबाबाच्या आधारे ईडीनं मागील महिन्यात अनिल परब यांना समन्स बजावलं होतं. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परब यांनी दोन आठवड्यांची मुदत मागून घेतली होती. ईडीनं ती मान्य केली होती. गणेशोत्सव पार पडल्यानंतर आता ईडीनं पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावलं आहे.

सचिन वाझेने काय आरोप केले होते?

मुंबईतील दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सचिन वाझेनं केला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, जुलै २०२० मध्ये मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काढलेले बदल्यांचे आदेश अनिल देशमुख आणि अनिल परब यांनी रद्द करायला लावले होते. बदली रद्द झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांकडून ४० कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्यातील प्रत्येक २० कोटी रुपये देशमुख आणि परब यांना मिळाले होते. अनिल देशमुख यांना त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे यांच्या माध्यमातून तर, परब यांना बजरंग खरमाटेंच्या माध्यमातून हे पैसे मिळाल्याचे वाझेनं त्याच्या जबाबात सांगितलं आहे.

आणखी वाचा:

डोंबिवली बलात्कार प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर

कोळशाच्या भीषण टंचाईमुळं महाराष्ट्रासमोर नवं संकट

नवे पुणे वसविण्याची योजना; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

Source link

anil deshmukhed summons anil parabmoney laundering caseअनिल देशमुखअनिल परबअनिल परब यांना ईडीचे समन्स
Comments (0)
Add Comment