असे अनेकदा घडते की जेव्हा तुम्ही कॉलवर कोणाशी बोलत असता तेव्हा ऑनलाइन काहीतरी बघायचे किंवा सर्च करायचे असल्यास ते कठीण होते. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे इंटरनेट कॉल सुरु असतांना काम करत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला ऑनलाइन काही सर्च असल्यास कॉल डिस्कनेक्ट करावा लागेल. बऱ्याचदा कॉलवर असतांना व्हॉट्सऍपवर काहीतरी पाठवायचे असल्यास ही डोकेदुखी ठरते. पण आता यापुढे तुमच्यासोबत असे होणार नाही, आता तुम्ही तुमच्या फोनमध्ये इंटरनेटमध्ये ही सेटिंग करून या समस्येवर तोडगा काढू शकता.
या सेटिंग केल्यास कॉल दरम्यानही चालेल इंटरनेट
- कॉल करताना इंटरनेट वापरण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये ही सेटिंग करावी लागेल. यासाठी सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा.
- स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर, सिम आणि नेटवर्क सेटिंग्जच्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर सिम ऑप्शनवर क्लिक करा.
- आता येथे सिम निवडा ज्याची सेटिंग्ज तुम्हाला बदलायची आहेत. यानंतर, थोडे खाली स्क्रोल करा आणि ऍक्सेस पॉइंट नेम्सच्या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर इंटरनेट पर्यायावर जा, थोडे खाली स्क्रोल करा आणि bearer पर्यायावर क्लिक करा. यानंतर LTE ऑप्शनवर क्लिक करा. lनंतर ओके वर क्लिक करा.
असे ठरेल फायदेशीर
केल्यानंतर, तुम्ही कॉलवर बोलत असतानाही आरामात इंटरनेट वापरू शकाल. यानंतर, तुम्ही कॉलवर व्हॉट्सॲप तपासू शकता, Google सारख्या ब्राउझरवर काहीही सर्च करू शकता. यानंतर तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी कॉल डिस्कनेक्ट करावा लागणार नाही. या सेटिंग केल्यास फोन हॅंग होणार नाही
- जर तुम्हाला फोन हँग नेहमी होण्यापासून रोखायचा असेल तर या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे यासाठी तुमच्या फोनचे स्टोरेज रिकामे, मोठ्या आणि अनावश्यक फाइल्स डिलीट करा.
- तुमच्या फोनमधील ॲप्स वारंवार अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे. • फोनच्या बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले ॲप्स बंद करा आणि फोन रीस्टार्ट करा. कधीकधी फोन रीस्टार्ट करून काही समस्या सोडवल्या जाऊ शकतात.
तसेच, किंवा सेटअप केल्यानंतर कोणत्याही अडथळ्याशिवाय एकावेळी कॉल व चॅट तुम्हाला वापरता येईल