व्हॉट्सॲपवर इंटरनेटशिवाय फाइल शेअरिंग फीचर कसे काम करेल याबाबत काही माहिती लीक झाली आहे. यासंबंधी काही स्क्रीनशॉट्स समोर आले आहेत. या फीचरसाठी WhatsApp ला तुमच्या फोनवरून कोणत्या परवानग्या आवश्यक असणार हे या स्क्रीनशॉट्समध्ये दिसत आहे. यातील एक महत्त्वाची परमिशन म्हणजे ‘जवळपासचे फोन सर्च करणे’ ज्यावर हे फीचर काम करते. ही Android ची सर्वसाधारण परवानगी आहे जी ब्लूटूथद्वारे जवळपासचे फोन शोधण्यात आणि त्यांच्याशी फाईल्स शेअर करण्यात मदत करते. पण तुमची इच्छा नसेल तर तुम्ही ही परमिशन बंदही करू शकता.
परमिशन आवश्यक असेल
इंटरनेटशिवाय व्हाट्सएपवर फाइल्स शेअर करण्यासाठी काही परमिशन आवश्यक असतील. सर्वप्रथम, या फीचरला आजूबाजूचे कोणते फोन सपोर्ट करतात हे सांगण्यासाठी परमिशन लागेल. ब्लूटूथद्वारे जवळपासचे फोन शोधण्याची ही सर्वसाधारण परवानगी आहे, जी तुम्ही हवे असल्यास बंद देखील करू शकता. दुसरी परवानगी तुमच्या फोनच्या फाइल्स आणि फोटो गॅलरीमध्ये एंटर करण्याची असेल जेणेकरून तुम्हाला जी फाईल शेअर करायची असेल ती WhatsApp शोधू शकेल. तिसरी परवानगी लोकेशनची असेल जेणेकरून दुसरा फोन कनेक्ट होण्यासाठी पुरेसा जवळ म्हणजेच रेंजमध्ये आहे की नाही हे कळू शकेल. ही परवानगी आवश्यक आहे पण काळजी करण्याची गरज नाही कारण WhatsApp फोन नंबर लपवून आणि फाइल्स एन्क्रिप्ट करून शेअरिंग सुरक्षित करेल.
ShareIT प्रमाणे काम करेल
हे नवीन फीचर जुन्या ShareIT सारख्या ॲप्सप्रमाणे काम करेल. हे ॲप इंटरनेटशिवाय दोन फोनमध्ये फाइल्स शेअर करायचे. लोक अनेकदा व्हॉट्सॲपवर फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट शेअर करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी हे नवीन फीचर खूप उपयुक्त ठरणार आहे.
सध्या ट्रायल फेजमध्ये
व्हॉट्सॲपवर इंटरनेटशिवाय फाइल्स शेअर करण्याचे हे फिचर अद्याप ट्रायल फेजमध्ये आहे, म्हणजेच ते अद्याप सामान्यांसाठी लाँच करण्यात आलेले नाही. पण ते लवकरच येत आहे. ही नवीन फाईल शेअरिंग पद्धत सोपी आणि सेफ करेल.