चंद्रपुरातील वन अकादमीचा विस्तार होणार; CM कडून मिळाला ग्रीन सिग्नल

हायलाइट्स:

  • चंद्रपुरातील वन अकादमीचा विस्तार होणार
  • CM कडून मिळाला ग्रीन सिग्नल
  • सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश

चंद्रपूर : चंद्रपूर येथील वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी अर्थात वन अकादमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. चंद्रपूर वन अकादमीच्या विस्तार आणि विकासासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार , मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी,उपसचिव गजेंद्र नरवणे उपस्थित होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख ) जी. साईप्रकाश, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व वन विभागाचे अन्य अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आश्चर्यकारक! आकाशातून पडला चक्क सोनेरी दगड, उस्मानाबादच्या घटनेनं खळबळ

स्वतंत्र संचालक पद

वन अकादमीला स्वायत्त संस्था म्हणून विकसित करण्यासाठी संचालक पदावर स्वतंत्र व्यक्तीची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी. तसेच संस्थेत वन अधिकारी प्रशिक्षणासोबतच वन, वन्यजीव, पर्यावरण व वातावरण बदल या आधारित पदविका ते पदव्युत्तर अभ्यासक्रम आयोजित करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

कोविड संकटाच्या काळात चंद्रपूर वन अकादमीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. आता अकादमीचे व प्रशिक्षण केंद्राचे कामकाज सुरू करावयाचे असल्याने कोविड केअर सेंटरचे पर्यायी जागेत स्थलांतर करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी जागेची पाहणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

वन अकादमीचे रूपांतर वन विद्यापीठात करण्यासाठी समिती नेमावी, अकादमीतील रिक्त पदांची भरती करावी, अकादमीतील उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा,अकादमीत वन, पर्यावरण व आयुर्वेदावर आधारित अभासक्रम सुरू करावेत अशा मागण्या यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.

cyclone Alert : पुढच्या १२ तासात महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Source link

chandrapur forest departmentchandrapur jilla news livechandrapur news livechandrapur news live todayCHANDRAPUR news todaycm uddhav thackerayforest academy at chandrapurmaharashtra news today in marathisudhir mungantiwar latest news
Comments (0)
Add Comment