14 इंची डिस्प्लेसह Lenovo IdeaPad Pro 5i भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Lenovo कंपनीने IdeaPad Pro 5i भारतात लॉन्च केले आहे. हा कंपनीचा नवा लॅपटॉप आहे जो AI फीचर्सने सुसज्ज आहे. डिसेंबरमध्ये हा लॅपटॉप इंटरनॅशनल पातळीवर लॉन्च करण्यात आला होता. शिवाय, आता कंपनीने ते अपग्रेडेड फिचर्ससह भारतात सादर केले आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा OLED डिस्प्ले आहे. शिवाय, यात इंटेल कोअर अल्ट्रा सीरीज CPU असणार आहे. या लॅपटॉपमध्ये 32GB रॅम आणि 1TB स्टोरेज देण्यात आला आहे. तर या लॅपटॉपची बॅटरी 84Wh आहे, यासह फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल आहे. कंपनीने दावा के आहे की हा लॅपटॉप 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 3 तासांपर्यंत चालेल. त्याची किंमत व स्पेसिफिकेशनशी विषयी डिटेल्स जाणून घ्या..

Lenovo IdeaPad Pro 5i Pricing and Availability

कंपनीने Lenovo IdeaPad Pro 5i 109,990 रुपये इतक्या किंमतीत लॉन्च केला आहे. त्याची विक्री आज 23 एप्रिलपासून सुरू झाली आहे. हा लॅपटॉप कंपनीच्या वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येईल. यामध्ये फक्त आर्क्टिक ग्रे कलरचा पर्याय देण्यात आला आहे.

Lenovo IdeaPad Pro 5i Specifications
-14 इंचाचा OLED डिस्प्ले

– इंटेल कोर अल्ट्रा 9 185H प्रोसेसर
– NVIDIA GeForce RTX 4050 लॅपटॉप GPU
– 84Wh बॅटरी

फीचर्सवर एक नजर टाकायची असल्यास Lenovo IdeaPad Pro 5i मध्ये 14-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, त्याच्या रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. शिवाय त्याचे, रिझोल्यूशन 2.8K आहे. हे डोळ्यांच्या सिक्युरिटीसाठी ब्यू लाइट प्रोटेक्शनसह येते. हा लॅपटॉप Windows 11 Pro वर काम करतो.

याशिवाय हा लॅपटॉप इंटेल कोअर अल्ट्रा 9 185 एच प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 32 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेज उपलब्ध असेल. ग्राफिक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात NVIDIA GeForce RTX 4050 लॅपटॉप GPU सपोर्ट देण्यात आला आहे.

या लॅपटॉपची बॅटरी 84Wh आहे. हा लॅपटॉप एका चार्जवर 14 तास चालतो. सोबतच, या लॅपटॉपमध्ये रॅपिड चार्ज एक्सप्रेस चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की हा लॅपटॉप 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 3 तासांपर्यंत चालेल. यात ऑडिओसाठी डॉल्बी ॲटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे. हा लॅपटॉप MIL-STD-810H मल्टी-ग्रेड स्टँडर्डसह येतो. यात उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी Thunderbolt 4, USB-C 3.2 Gen 1, HDMI 2.1 मिळेल.

Source link

laptop offerslaptop with AILenovo IdeaPad Pro 5ilenovo new laptopलेनोवो आयडियापॅड प्रो 5आय
Comments (0)
Add Comment