OnePlus 13 चे लीक स्पेसिफिकेशन्स
डिजिटल चॅट स्टेशननं दिलेल्या माहितीनुसार, OnePlus 13 मध्ये मायक्रो-कर्व्ड डिजाइनसह ६.८ इंचाचा OLED LTPO डिस्प्ले असेल, ज्याचे रिजोल्यूशन २के रेजॉल्यूशन असेल. तसेच यात अल्ट्रासॉनिक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर असण्याची शक्यता आहे. जुन्या वनप्लस फ्लॅगशिप मध्ये ऑप्टिकल अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. टिपस्टरनुसार, कंपनी सध्या अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सरची टेस्टिंग करत आहे. त्यामुळे एंड प्रोडक्टमध्ये हाच सेन्सर असेल हे आत्ताच सांगता येणार नाही.
लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की OnePlus 13 मल्टी-फोकल कॅमेरा सिस्टम असेल. जुन्या मॉडेल प्रमाणे OnePlus 13 मध्ये हाय ऑप्टिकल झूमसाठी पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेऱ्याचा वापर केला जाईल. याआधी आलेल्या लीकमध्ये दावा करण्यात आला आहे की OnePlus 13 मध्ये नवीन रियर डिजाइन असेल. आज देखील टिप्सटरनेनं दावा केला आहे की OnePlus 13 ची इंडस्ट्रियल डिजाइन पूर्णपणे नवीन असू शकते.
OnePlus चे काही Ace आणि नंबर सीरीजच्या फ्लॅगशिप फोनमध्ये अशीच रियर डिजाइन पाहायला मिळाली होती. यावर्षी कंपनीनं चीनमध्ये Ace सीरीजचे दोन फोन एस ३ आणि एस ३व्ही लाँच केले आहेत. एस ३ मध्ये सामान्य राउंड शेप कॅमेरा डिजाइन मिळते परंतु ३व्ही मध्ये एक नवीन वर्टिकल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. आता पाहावं लागेल की OnePlus 13 मध्ये Ace 3V ची प्रीमियम व्हर्जन डिजाइन मिळते की नाही.