फळे आणि भाज्या उन्हाळ्यात होणार नाहीत खराब; आता घ्या स्वस्त, पोर्टेबल मिनी फ्रीज

अनेकदा विद्यार्थी किंवा कर्मचारी वर्गाला अभ्यास किंवा कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागते. अशावेळी पदार्थ साठवणे व टिकवणे हि एक मोठी समस्या बनून जाते. अशावेळी मिनी रेफ्रिजरेटर म्हणजेच आकाराने छोटे असणारे पण तितकेच कुलिंग देणारे फ्रीज नक्कीच उपयोगी येतात.

43 L स्टोरेज असलेले सिंगल डोअर रेफ्रिजरेटर

LG कडून 43 L स्टोरेज असलेले सिंगल डोअर रेफ्रिजरेटर आहे. त्याचा वापर विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम आहे आणि ज्या लोकांच्या घरात जागा कमी आहे त्यांच्यासाठीही हे रेफ्रिजरेटर सर्वोत्तम आहे, कारण त्याची रचना अतिशय पोर्टेबल आहे आणि ते शक्तिशाली कूलिंग देखील प्रदान करते. हा 4 स्टार रेफ्रिजरेटर आहे, त्यामुळे वीज बिलही आणखी वाढणार नाही. ग्राहक हे फक्त 9,990 रुपयांना खरेदी करू शकतात.

केल्विनेटर मिनी रेफ्रिजरेटर 45 लिटर

केल्विनेटरचा हा मिनी रेफ्रिजरेटर 45 लिटर क्षमतेचा आहे, याचा अर्थ विद्यार्थी जवळपास प्रत्येक खाद्यपदार्थ त्यामध्ये ठेवू शकतात, आणि त्याचा आकारही लहान आहे, त्यामुळे हा रेफ्रिजरेटर कुठेही बसवता येऊ शकतो. हा रेफ्रिजरेटर 1 स्टार रेटिंगसह येतो. ग्राहक हा रेफ्रिजरेटर 9,990 रुपयांना खरेदी करू शकतात.

गोदरेज 30 लिटर एल क्यूब बार फ्रीज रेफ्रिजरेटर

गोदरेज 30 लीटर एल क्यूब बार फ्रिज रेफ्रिजरेटरची क्षमता 30 लीटर आहे आणि सामान्य रेफ्रिजरेटरपेक्षा आकाराने खूपच लहान आहे. गोदरेजचे हे रेफ्रिजरेटर 30 लीटर क्षमतेचे आहे, त्यामुळे युजर्स त्यात भरपूर खाद्यपदार्थ ठेवू शकतात. हा रेफ्रिजरेटर ग्राहक फक्त 7,790 रुपयांना खरेदी करू शकतात.

क्रोमा 50 लिटर 2 स्टार डायरेक्ट कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर

क्रोमाचे हे रेफ्रिजरेटर 50 लिटर क्षमतेचे आहे. हा 2 स्टार रेफ्रिजरेटर आहे जो किफायतशीर आहे तसेच चांगला थंडावा देतो आणि त्याची रचना देखील पोर्टेबल आहे. हा रेफ्रिजरेटर फक्त 9,490 रुपयांना खरेदी करता येईल.

Source link

affordable refrigeratormini refrigeratorportable refrigeratorकिमतीत परवडणारे फ्रीजछोटे फ्रीजहलवता येणारे फ्रीज
Comments (0)
Add Comment