फिंगरप्रिंटच्या मदतीने मिळवतात महत्वाची कागदपत्रे
फिंगरप्रिंटच्या मदतीने हे गुन्हेगार तुमचे बँक खाते, आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील मिळवू शकतात. या स्कॅममध्ये घोटाळेबाज बनावट फिंगरप्रिंट तयार करतात आणि निरपराध लोकांची बँक खातीही रिकामे करतात. गेल्या वर्षी बिहार पोलिसांनी अशाच एका फिंगरप्रिंट क्लोन बनवणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश केला होता. यात पोलिसांनी त्यांच्याकडून 512 लोकांचे क्लोन फिंगरप्रिंट जप्त केले होते.
कसे बनवतात क्लोन फिंगरप्रिंट
क्लोन फिंगरप्रिंट बनवण्यासाठी, या गुन्हेगारांना तुमच्या अंगठ्याचा ठसा आवश्यक आहे, जो ते अतिशय हुशारीने तुमच्याकडून मिळवतात. या अंगठ्याच्या ठशाच्या मदतीने ते प्लास्टिकच्या अंगठ्यावर बनावट थंब इम्प्रेशन तयार करतात आणि मग ते तुमचे खाते रिकामे करू लागतात. हे स्कॅमर्स कमी शिक्षित आणि आधार सपोर्टेड पेमेंट सिस्टम (AePS) वापरणाऱ्या लोकांना टार्गेट करतात .
AePS प्रणाली म्हणजे काय?
2014 मध्ये सरकारने आधार सक्षम पेमेंट प्रणाली सुरू केली होती त्याला AePS प्रणाली म्हणतात. ज्यांच्या जवळ बँका किंवा पोस्ट ऑफिस नाहीत अशा ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा व्हावा हा या प्रणालीचा उद्देश होता. हे लोक जवळच्या सायबर कॅफे किंवा सार्वजनिक सुविधा केंद्रात जाऊन AePS प्रणालीद्वारे पैसे काढू शकतात.
AePS प्रणालीमधून पैसे काढण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला फक्त आधार कार्ड क्रमांक आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरावे लागेल. यामध्ये थंब आणि आयरिस स्कॅनचा समावेश आहे. यानंतर तो त्याच्या बँक खात्यातून सहज पैसे काढू शकतो. सायबर फसवणूक करणारे देखील या सोप्या प्रक्रियेचा वापर करतात. निरपराध गावकऱ्यांना अडकवण्यासाठी सायबर गुन्हेगार त्यांना झटपट कर्ज आणि शिधापत्रिका बनवण्याचे आमिष दाखवतात आणि त्याद्वारे त्यांच्या बोटांचे ठसे घेतात आणि त्यानंतर क्लोन फिंगरप्रिंट बनवून बँक खाती रिकामी करतात.