WhatsApp Passkeys
व्हॉट्सअॅपच्या आयओएस व्हर्जनमध्ये पासकी सपोर्ट असल्यामुळे युजर्सना अतिरिक्त सुरक्षा लेयर मिळेल. या अपडेशननंतर युजर्सना प्रत्येकवेळी लॉग-इन करण्यासाठी पासकोड टाकण्याची गरज नाही. विशेष म्हणजे ही सुविधा ऑक्टोबर २०२३ मध्ये सर्वप्रथम Android युजर्ससाठी जारी करण्यात आली होती.
जर तुम्ही iPhone युजर असाल आणि पासकी फीचरचा वापर करू शकत नसाल तर सर्वप्रथम अॅप स्टोर जाऊन व्हॉट्सअॅप अपडेट करा. त्यानंतर देखील फीचर नाही मिळालं तर थोडी वाट पाहा आणि काही दिवसांनी पुन्हा एकदा चेक करा.
Passkeys म्हणजे काय?
टेक्नॉलॉजीच्या या युगात डेटा चोरीची प्रकरणे वाढली आहेत. यामुळे अॅप सिक्योर बनवण्यासाठी सतत नवनवीन सुविधा येत आहेत, ज्यातील एक पासकी आहे. हे फीचर फक्त लॉग-इन प्रोसेस सोपी करत नाही तर अतिरिक्त सुरक्षा देखील देतं. हे फिचर आल्यामुळे युजर्सना आता व्हॉट्सअॅपमध्ये लॉग-इन करण्यासाठी ६ अंकी कोड टाकण्याची गरज नाही.
पासकीच्या माध्यमातून युजर्स फेस किंवा टच आयडीचा वापर करून व्हॉट्सअॅपमध्ये लॉग-इन करता येईल. यासाठी युजर्सना सर्वप्रथम सेटिंगमध्ये जावं लागेल. इथे अकाऊंट सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर पासकी फीचर मिळेल, ज्यावर क्लिक करून तुम्ही फीचरचा वापर करू शकाल.
चॅट फिल्टरचे डिटेल
मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपनं या महिन्याच्या सुरुवातीला चॅट फिल्टर लाँच केलं होतं. यात All, Unread आणि Groups चा समावेश आहे. या फिल्टरच्या मदतीनं युजर्स प्लॅटफॉर्मवर आवश्यक मेसेज सहज सर्च करू शकतात.
ऑफलाइन फाइल शेयरिंग
व्हॉट्सॲपवर इंटरनेटशिवाय फाइल शेअरिंग फीचर कसे काम करेल याबाबत काही माहिती लीक झाली आहे. यासंबंधी काही स्क्रीनशॉट्स समोर आले आहेत. या फीचरसाठी WhatsApp ला तुमच्या फोनवरून कोणत्या परवानग्या आवश्यक असणार हे या स्क्रीनशॉट्समध्ये दिसत आहे. यातील एक महत्त्वाची परमिशन म्हणजे ‘जवळपासचे फोन सर्च करणे’ ज्यावर हे फीचर काम करते. ही Android ची सर्वसाधारण परवानगी आहे जी ब्लूटूथद्वारे जवळपासचे फोन शोधण्यात आणि त्यांच्याशी फाईल्स शेअर करण्यात मदत करते. पण तुमची इच्छा नसेल तर तुम्ही ही परमिशन बंदही करू शकता.