Fact Check: लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाने देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झाला आहे. याकाळात मतदानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडिओची मोठी चर्चा होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका मतदान केंद्रावर एका महिलेचा हात पकडून मतदान केलं जात असल्याचा दावा केला जात आहे. पण निवडणूक आयोग मात्र काहीच कारवाई करत नाही. न्यूजचेकरच्या फॅक्ट चेक टीमने या व्हिडिओची तपासणी केली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत दावा केला जात आहे की, मतदान केंद्रावर महिलेचा हात धरुन मतदान केलं जात आहे, मात्र यावर निवडणूक आयोग गप्प आहे. आर्काइव पोस्ट येथे पाहा.

Fact Check : उमा भारती यांनी पंतप्रधान मोदींना ‘विनाश पुरुष’ म्हटलं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

पडताळणीत काय समोर आलं?

व्हायरल व्हिडिओच्या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी न्यूजचेकरच्या फॅक्ट चेक टीमने व्हायरल व्हिडिओच्या की-फ्रेम्सला रिवर्स इमेज सर्च केलं. त्यावेळी हा व्हिडिओ २२ मे २०१९ रोजी ‘ट्रायकलर न्यूज नेटवर्क’ नावाच्या यूट्यूब चॅनेलने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये आढळला.

जवळपास एक मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये ती महिला पोलिंग एजंटच्या रुपात इतर मतदारांसह ईव्हीएमच्या ठिकाणाला भेट देत असल्याचे आणि तिच्या सूचनेनुसार त्यांना मतदान करण्यास सांगत असल्याचं दिसतं आहे.
Fact Check: भाजपच्या रॅलीत महिला कार्यकर्त्याचा विनयभंग? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य
तपासात व्हायरल व्हिडिओसह २०१९ मध्ये शेअर केलेल्या अनेक फेसबुक पोस्ट मिळाल्या. या पोस्ट इथे आणि इथे पाहता येतील. हा व्हिडिओ पाच वर्षांपूर्वी वन इंडिया तमिळद्वारा डेलीमोशन वेबसाइटवरही अपलोड करण्यात आला होता.

व्हिडिओचा तपास करताना व्हायरल व्हिडिओसह १५ मे २०१९ रोजी शेअर केलेले अनेक पोस्ट एक्सवर आढळले. त्या पोस्ट इथे, इथे आणि इथे पाहता येतील.

संजय राऊतांनी नगरसेवकाची निवडणूक लढवून दाखवावी, गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांचं आव्हान

निष्कर्ष

व्हिडिओच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओची योग्य वेळ आणि ठिकाण आढळलं नाही. पण तपासात हे स्पष्ट झालं, की व्हायरल व्हिडिओ २०१९ किंवा त्याहून आधीचा आहे. या व्हिडिओचा सध्याच्या लोकसभा निवडणुकांशी कोणताही संबंध नाही.

(This story was originally published by NewsChecker, and republished by MT as part of the Shakti Collective.)



Source link

fact checkfact check newsfact check video rigging in lok sabhaLok Sabha 2024फॅक्ट चेकफॅक्ट चेक व्हिडिओलोकसभा २०२४
Comments (0)
Add Comment