G-5600BG-1 घड्याळ रिसायकल केलेल्या रेझिनपासून बनवलेले आहे आणि जी-शॉकचे पर्यावरणाच्या दृष्टीने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. कंपनीने म्हटले आहे की हे घड्याळ रिसायकल पुर्णपणे रिसायकल मटेरियलपासून तयार करण्यात आले आहे.
अनोखा क्लासिक लुक
मजबूत बिल्डसह येणारे हे दर्जेदार घड्याळ आपल्या टिकाऊपणासाठी ओळखले जाते. याशिवाय घड्याळातील रिसायकल मटेरिअल त्याला एक खास रंगीत पॅटर्न देते. अशा प्रकारे प्रत्येक घड्याळ आणि युनिट एकमेकांपेक्षा वेगळे दिसते. हेघड्याळ तुमच्यासाठी उत्तम चॉइस ठरू शकते.
खास सोलर चार्जिंग सपोर्ट
G-5600BG-1 हे घड्याळ सोलर टेक्नोलॉजीने सुसज्ज असणार आहे. कोणत्याही प्रकाश स्रोताच्या मदतीने चार्ज होते. याशिवाय, हे शॉक रेझीस्टंट आहे आणि 200 मीटर खोलीपर्यंतच्या पाण्यातही ते खराब होण्याची कोणतीही भीती नसेल. घड्याळात अलार्म, टायमर आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक कॅलेंडर सारखी फिचर्स उपलब्ध आहेत. तसेच, कंपनी या घड्याळाला इको-फ्रेंडली पॅकेजिंगमध्ये देत आहे.
एवढी असेल घड्याळाची किंमत
Casio G-5600BG-1 घड्याळाची किंमत जागतिक बाजारात 199 डॉलर्स (सुमारे 16,600 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर भारतीय बाजारपेठेत, कॅशिया आणि जी-शॉक स्टोअरमधून 9,995 रुपयांना खरेदी करता येईल. या घड्याळाची विक्री एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होईल.