वारंवार रिचार्जचे टेन्शन संपले; आता एक रिचार्जमध्ये 425 दिवस रहा टेन्शन फ्री, BSNL चा नवीन प्लॅन

दूरसंचार कंपनी BSNL ने लॉंग व्हॅलिडिटीसह एक उत्तम प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. युजरबेसच्या बाबतीत BSNL Jio, Airtel आणि Vi च्या मागे असले तरी BSNL आपल्या ग्राहकांसाठी अनोखे प्रीपेड प्लॅन लाँच करत आहे. लॉंग व्हॅलिडिटीची मागणी असलेल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, BSNL ने एक नवीन प्रीपेड प्लॅन आणला आहे, जो पूर्ण 425 दिवस चालेल. चला जाणून घेऊया त्याची किंमत आणि फीचर्सबद्दल सविस्तर…

अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

या प्लॅनमध्ये यूजर्सना 425 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. याशिवाय, ग्राहकांना दररोज 2GB डेटा देखील मिळतो, म्हणजेच संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान 850GB डेटा उपलब्ध असतो. दैनंदिन डेटा लिमिट संपल्यानंतरही, ग्राहक 40kbps स्पीडने इंटरनेट वापरणे सुरू ठेवू शकतात. इतकेच नाही तर प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसही मिळतात. हि योजना EROS Now सबस्क्रिप्शनसह मोफत PRBT (पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन) सह देखील येते.

सध्या फक्त जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या BSNL ग्राहकांसाठी

हा नवीन 425 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्रीपेड प्लॅन सध्या फक्त जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या BSNL ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. कंपनी इतर क्षेत्रात लॉन्च करणार की नाही याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही. जर तुम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये रहात असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी व्हॅल्यू फॉर मनी ऑप्शन असू शकतो पण तुम्ही इतर कोणत्याही भागात राहत असाल तर आधी हा प्लॅन तुमच्या भागात उपलब्ध आहे की नाही ते तपासा.

2998 रुपयांची 455 दिवसांची व्हॅलिडिटी

तुम्हाला अधिक व्हॅलिडिटी हवी असल्यास, तुम्ही BSNL च्या 2998 रुपयांच्या प्लॅनवर जाऊ शकता. 2998 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 455 दिवस आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या बीएसएनएल ग्राहकांसाठीही ते उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 3GB डेटा, दररोज 100 एसएमएस यांसारखे फायदे समाविष्ट आहेत.

Source link

BSNLlong validitypre-paid planदीर्घ वैधताप्री-पेड प्लॅनबीएसएनएल
Comments (0)
Add Comment