वरगव्हाण येथील नानासो गोरख पाटील ९४.३ माय एफ.एम.तर्फे आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित;जळगाव जिल्ह्यातील ४० शेतकऱ्यांचा आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरव…


जळगांव: येथील हॉटेल प्रेसिडेंट येथे ९४.३ माय एफ.एम. तर्फे कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कष्टाला सलाम म्हणून शेतीत वेगवेगळ्या पद्धती वापरून,नव्या आधुनिक तंत्राचा वापर करून प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी “फँन्टास्टिक फार्मर अवॉर्ड” वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेती व्यवसायात आपले नावलौकिक मिळवित चांगले उत्पन्न घेणारे शेतकरी व शेती व्यवसायात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील तब्बल ४० शेतकऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

चोपडा तालुक्यातील वरगव्हाण गावाचे पोलीस पाटील तसेच प्रगतिशील शेतकरी नानासो गोरख रामकृष्ण पाटील यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक – डी. डी. बच्छाव, जळगांव महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन माय एफ.एम.चे विवेक पॉन यांनी मानले. यावेळी वरगव्हाण ग्रामपंचायत सरपंच भुषण गोरख पाटील,उपसरपंच मिना प्रताप बारेला, सदस्य रवी भाऊ पाटील, जहांगीर तडवी, जावेद तडवी, सदस्या, इंद्रायणी महेंद्र पाटील, यास्मिन युनूस तडवी, सायलिबाई देवाजी पावरा, सपना सुरशिंग पावरा,गावातील समाजसेवक हैदर तडवी, जाँबाज तडवी,महेंद्र पाटील व तमाम ग्रामस्थांनी गोरख पाटील नाना यांचे अभिनंदन केले.

facebookआजचं भविष्यकरोनापुणेमुंबईशिवसेना
Comments (0)
Add Comment