‘काँग्रेसकडून तुमची लूट रोखण्यासाठी, मी ढाल बनेन’- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुरैना: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेसवरील हल्ला अधिक तीव्र करताना, ‘नागरिकांना लुटण्याची काँग्रेसची योजना रोखण्यासाठी आपण नागरिक आणि काँग्रेसमध्ये ढाल म्हणून उभे राहू,’ असे सांगितले.

मध्य प्रदेशातील मुरैना शहरात एका निवडणूक रॅलीला ते संबोधित करीत होते. ‘माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांच्या मातोश्री इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांची मालमत्ता सरकारकडे जाण्यापासून वाचवण्यासाठी ‘वारसा कर’ रद्द केला होता. याचा फायदा करून घेतल्यानंतर काँग्रेसला आता पुन्हा देशातील नागरिकांवर हा कायदा लादायचा आहे,’ असा दावा त्यांनी यावेळी केला. काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या वाडवडिलांनी मागे ठेवलेली निम्म्याहून अधिक मालमत्ता ‘वारसा करा’द्वारे काढून घेईल, असा आरोपही त्यांनी केला.
सत्तेची मस्ती भाजपच्या डोक्यात गेली, त्यांच्या सत्तेचे सिंहासन उध्वस्त करा- अहमदनगरमध्ये शरद पवारांचा एल्गार

‘स्वत:ला देशभक्त म्हणवणाऱ्यांना जातगणनेच्या ‘एक्स-रे’ची भीती वाटते,’ अशी टीका राहुल गांधी यांनी बुधवारी केली होती. त्याला उत्तर देताना मोदी म्हणाले की, काँग्रेसला लोकांचे दागिने आणि अल्पबचत जप्त करायची आहे आणि त्यांच्या संपत्तीचा आणि मौल्यवान वस्तूंचा ‘एक्स-रे’ करून घ्यायचा आहे.

ते म्हणाले, ‘काँग्रेसने केलेली पापे कान देऊन ऐका. मला एक मनोरंजक तथ्य समोर आणायचे आहे. इंदिरा गांधींचे निधन झाले तेव्हा एक कायदा होता, ज्या अंतर्गत अर्धी मालमत्ता सरकारकडे गेली असती. मात्र, इंदिराजींनी त्यांची संपत्ती त्यांचे पुत्र राजीव गांधी यांच्या नावावर केली होती, अशी चर्चा त्यावेळी होती.
मी अजून सांगतोय,सन्मान राखा…; अन्यथा तो फोटो व्हायरल करेन- सतेज पाटलांचा संजय मंडलिक यांना इशारा

मोदी म्हणाले, ‘सरकारच्या खजिन्यात जाणारा पैसा वाचवण्यासाठी, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वारसा कर रद्द केला होता. काँग्रेसला आता हा कर अधिक सक्षमपणे लागू करायचा आहे, कारण त्यांच्या चार पिढ्यांनी संपत्तीचा फायदा घेतला आहे.

वचनं तुम्ही पाळली नाही अन् शिव्या आम्हाला देता? शरद पवारांनी मोदींना ऐकवलं, भाषण गाजवलं

भाजप असेपर्यंत अशा योजना यशस्वी होऊ देणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले. काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यास तुम्ही कष्टाने जमा केलेली संपत्ती तुमच्याकडून लुटली जाईल. परंतु मोदी काँग्रेस आणि तुमच्यामध्ये भिंत बनून उभे आहेत, असेही ते म्हणाले.

Source link

Congressloksabha election 2024PM Narendra ModiPM Narendra Modi on Congressपंतप्रधान नरेंद्र मोदीलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment