इंग्लंडच्या कॅफेत सापडली सांगलीतल्या मंडपवाल्याची खुर्ची, १३ वर्षाआधीच भंगारात दिली होती अन्….

हायलाइट्स:

  • हे कसं शक्य आहे?
  • इंग्लंडच्या कॅफेत सापडली सांगलीतल्या मंडपवाल्याची खुर्ची
  • १३ वर्षाआधीच भंगारात दिली होती अन्….

सांगली : क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी इंग्लंडच्या मॅंचेस्टर शहरातील एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियात पोस्ट केला आहे. सांगली जिल्ह्यातील सावळजच्या मंडप व्यावसायिकाने सुमारे तेरा वर्षांपूर्वी जुन्या खुर्च्या भंगारात घातल्या होत्या. ते भंगार इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर एका हॉटेल व्यावसायिकाने जुन्या खुर्च्यांची खरेदी केली. त्याच खुर्च्या सध्या मॅंचेस्टरच्या एका कॅफेत वापरल्या जातात. खुर्च्यांवरील ‘बाळू लोखंडे, सावळज’ या मराठी अक्षरांमुळे सुनंदन लेले यांनी कुतूहलापोटी हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आणि त्यानंतर खुर्च्यांच्या प्रवासाबाबत सर्वांनाच उत्सुकता वाढली होती.

त्याचे झाले असे, की बाळू लोखंडे हे सावळज गावातील मंडप व्यवसायिक आहेत. वयाच्या साठीत असलेल्या या मंडप व्यवसायिकाकडे जुन्या लोखंडी खुर्च्या होत्या. तेरा वर्षांपूर्वी त्यांनी जुन्या खुर्च्या भंगारात घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जुन्या खुर्च्या विकून त्यांनी नव्या फायबरच्या खुर्च्या घेतल्या. योगायोगाने लोखंडे यांनी विकलेले खुर्च्यांचे भंगार इंग्लंडमधील एका व्यवसायिकाने खरेदी केले. त्या खुर्च्या इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर त्यावर एका हॉटेल व्यावसायिकाची नजर पडली.
आश्चर्यकारक! आकाशातून पडला चक्क सोनेरी दगड, उस्मानाबादच्या घटनेनं खळबळ
वापरण्यायोग्य असल्याने त्यांनी पंधरा खुर्च्या खरेदी केल्या. त्या खुर्च्यांवर ‘बाळू लोखंडे, सावळज’ असे मराठीत लिहिले आहे. काही खुर्च्यांवरील रंग उडाला आहे. काही अक्षरेदेखील पुसली गेली आहेत. मँचेस्टरमध्ये जुन्या वस्तू आपुलकीने सांभाळल्या जातात. त्याच भावनेतून कॅफे मालकाने भंगारातून आणलेल्या जुन्या खुर्च्या आपल्या कॅफेत वापरासाठी ठेवल्या आहेत.

क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले हे चार दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीसोबत मॅंचेस्टरमध्ये गेले होते. फोटो शूटच्या कामानिमित्त ते एका कॅफेत पोहोचले. जुन्या खुर्च्या पाहून त्यांनाही कुतूहल वाटले. खुर्च्यांच्या मागील अक्षर पाहिल्यानंतर मात्र त्यांना धक्काच बसला. ‘बाळू लोखंडे, सावळज’ ही मराठी अक्षरे बघितल्यानंतर त्यांनी खुर्च्यांबाबत कॅफेच्या मालकाशी संवाद साधला. यातून खुर्च्यांच्या सावळज ते मॅंचेस्टर प्रवासाचा उलगडा झाला. मॅंचेस्टरमधील मराठी अक्षरांच्या खुर्च्यांचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियात व्हायरल केल्यानंतर याबाबत उत्सुकता वाढली होती. महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सुनंदन लेले यांनी हा खुर्च्यांच्या प्रवास उलगडला.

दरम्यान, लेले यांनी बाळू लोखंडे यांचा मोबाईल नंबर मिळवून संपर्क साधला. तेरा वर्षांपूर्वी भंगारात घातलेल्या खुर्च्या थेट मॅंचेस्टरमध्ये पोहोचतील याची कल्पनाही कधी लोखंडे यांनी केली नव्हती. भंगारात घातलेल्या खर्च्यांनी सोशल मीडिया प्रसिद्धी मिळवून दिल्यानंतर लोखंडे अचंबित झाले आहेत. आपल्या नावाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केल्याबद्दल त्यांनी सुनंदन लेले यांना भोजनाचे निमंत्रण दिले आहे. सावळजच्या खुर्च्या थेट इंग्लंडमध्ये पोहोचल्या आहेत. शिवाय त्यांचा आहे त्या स्थितीत चांगला वापरदेखील सुरू असल्याने सावळजकरांना अभिमान वाटतोय.
cyclone Alert : पुढच्या १२ तासात महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Source link

balu lokhande chaircafe in englandsangli balu lokhande newssangli chair news todaySangli newssangli news todaysangli news today livesangli news today marathi
Comments (0)
Add Comment