मनीष कश्यप हा सध्या जामिनावर आहे. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रसिद्धिप्रमुख अनिल बलुनी, उपप्रमुख संजय मायूख आणि पक्षाचे उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघाचे उमेदवार मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत मनीष कश्यप याने भाजपप्रवेश केला. यावेळी त्याची आई उपस्थित होती.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मी तुरुंगात असताना नऊ महिने लढा देणाऱ्या माझ्या आईने मला भाजपप्रवेशाचा सल्ला दिला,’ असे कश्यप याने सांगितले.
उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर जाण्यास इच्छुक असलेले मनोज तिवारी यांनी कश्यप याच्या भाजपप्रवेशाबाबत आनंद व्यक्त केला. कश्यपचे यूट्यूबवर ८० लाखांवर फॉलोअर आहेत. त्याने कायमच मोदींना पाठिंबा दिला असून आपली राजकीय महत्त्वाकांक्षाही कधीही लपवून ठेवलेली नाही. कश्यप याने राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर अनेकदा टीका केली आहे. याआधी त्याने बिहारमध्ये विधानसभा निवडणूकही लढवली होती.
मनोज तिवारी यांच्याविरोधात काँग्रेसने बिहारमधील कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कश्यप हा तिवारी यांच्यासाठी प्रचारात उतरण्याची शक्यता आहे.