Reset Password Scam: iPhone युजर्सवर पासवर्ड हॅकिंगचे संकट, काय आहे नवीन स्कॅम; जाणून घ्या

तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुमच्या फोनबद्दलचा हा धोका माहीत असणे आवश्यक आहे. कारण काही काळापासून अनेक आयफोन यूजर्सना पासवर्ड रीसेट करण्याचे नोटीफीकेशन मिळत आहेत. फक्त एक नाही तर डझनभर नोटिफिकेशन युजर्सना मिळत आहेत असे त्यांनी सांगितले आहे.

अशा प्रकारे केली जाते डेटाची चोरी

iPhone युजर्सना पासवर्ड रिसेट करण्याचे हे नोटीफीकेसन हॅकर्स पाठवताय हे स्पष्ट झाले आहे. या प्रकारच्या गैरप्रकाराला मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन बॉम्बिंग किंवा MFA बॉम्बिंग असेही म्हणतात. या प्रकारच्या सायबर हल्ल्यात, यूजरार्सला त्यांच्या ऍपल आयडी पासवर्ड रीसेट करण्यास सांगणारे नोटीफिकेशन पाठवले जातात. तुम्ही चुकून पासवर्ड रीसेट केल्यास, स्कॅमर किंवा सायबर गुन्हेगार तुमचा पर्सनल डेटा चोरी करू शकतात.

KerbsonSecurity च्या रिपोर्टनुसार, ज्या लोकांना अशा सूचना पाठवल्या जात आहेत त्यांना Apple Support फोन नंबरवरून कॉल देखील येत आहेत. या कॉलदरम्यान तुमची प्राथमिक माहिती तुम्हाला दिली जाते, ज्यामुळे तुम्हाला विश्वास बसेल की कॉल नक्कीच Appleने केला आहे. सायबर गुन्हेगारांनी सोशल इंजिनीअरिंग आणि बेसिक सर्चद्वारे तुमची प्राथमिक माहिती आधीच मिळवलेली असते.

यूजरने शेअर केला अनुभव

X यूजर पार्थ यांने लिहिले आहे की, त्याच्यासोबत देखील असेच काहीसे घडले आहे. त्याच्या Apple डिवाइसवर पासवर्ड रीसेट करण्यासाठी 100पेक्षा अधिक नोटीफिकेशन आले. मात्र तरीही त्याने आपला पासवर्ड रिसेट केला नाही. यानंतर त्याला ॲपल सपोर्ट नंबरवरून स्कॅमर्सचा कॉल आला. स्कॅमरकडे पार्थबद्दल संपूर्ण माहिती होती जसे की त्याचा ईमेल आयडी, फोन नंबर, मात्र त्यांच्याजवळ असलेले पार्थचे नाव चुकीचे आढळले ज्यामुळे त्याला हे फेक असल्याचं त्याच्या लक्षात आले.

आयफोन युजर्ससोबत झालेल्या या घोट्याळाची अनेक प्रकरणं समोर आली आहे. हे धोके लक्षात घेऊन कंपनीने वेळोवेळी आपले सिक्युरिटी पॅच अपडेट केले आहे. कंपनी या समस्येवर काम करत असून लवकरच याबाबतचे सिक्युरिटी अपडेट मिळणार आहे.

iPhone युजर्स अशी घ्या काळजी

Apple कडून येणाऱ्या ईमेल किंवा मेसेजेसपासून सावध रहा आणि ईमेल आयडी किंवा डिटेल्स दोनदा तपासून घ्या. वेबसाइट्सचा URL देखील व्हेरिफाय करा व त्यात काहीही संशयास्पद दिसत असल्यास आपली माहिती देऊ नका. हे लक्षात ठेवावे की Apple तुमच्याशी फोन किंवा ईमेलद्वारे पासवर्डसह इतर पर्सनल डिटेल्स विचारण्यासाठी कधीही संपर्क साधत नाही

Source link

cyber criminalsiphone reset password scamiphone userspassword scamआयफोन युजर्सपासवर्ड स्कॅम
Comments (0)
Add Comment