HMD Vibeची किंमत
HMD Vibe चा एकच मॉडेल यूएस मार्केटमध्ये आला आहे. ज्याची किंमत १५० डॉलर ठेवण्यात आली आहे. ही किंमत भारतीय चलनात रूपांतरित केल्यास जवळपास १२,५०० रुपये होतात. फोनमध्ये ६जीबी रॅमसह १२८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.
हा फोन अमेरिकन बाजारात मे मध्ये उपलब्ध होईल. फोन एचएमडीच्या वेबसाइट व्यतिरिक्त अॅमेझॉन आणि बेस्ट बाय वरून खरेदी करता येईल. हा फोन भारतीय बाजारात येईल की याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही, परंतु लवकरच हा मॉडेल भारतीयांच्या हातात दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही.
HMD Vibeचे स्पेसिफिकेशन्स
HMD Vibe त्या युजर्ससाठी आला आहे ज्यांचं बजेट कमी आहे. फोनमध्ये ६.५६ इंचाचा डिस्प्ले आहे, ज्यात एचडी प्लस रिजोल्यूशन आहे. हा डिस्प्ले ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. HMD Vibe मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर ६जीबी रॅम मिळतो. इंटरनल स्टोरेज १२८ जीबी आहे. ही स्टोरेज एसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते, तर रॅम देखील वर्चुअली एक्सपांड करता येतो.
HMD Vibe मध्ये १३ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर २ एमपीचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ एमपीचा कॅमेरा आहे. फोनमध्ये ४ हजार एमएएचची बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत नाही. ही चार्ज करण्यासाठी बॉक्समध्ये फक्त १०वॉटचा चार्जर मिळतो. विशेष म्हणजे हा फोन आयपी५२ रेटिंगसह सादर करण्यात आला आहे, ज्यामुळे हा डस्ट-प्रूफ बनतो. हा फोन ५जी नाही किंवा यात फिंगरप्रिंट सेन्सरची देखील सुविधा नाही, त्यामुळे कंपनीनं कुठे पैसे वाचवलेत ते स्पष्ट दिसत आहे.