टेक ब्रँड iQOO ने आणले पहिले स्मार्टवॉच; आता फोनशी कनेक्ट न करता कॉलिंग शक्य

चिनी टेक कंपनी vivo शी संबंधित टेक ब्रँड iQOO ने स्मार्ट वेअरेबल सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे आणि ‘iQOO watch’ नावाचे पहिले स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. हे स्मार्टवॉच स्पेशल ब्लूओएस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते आणि त्यात eSIM सपोर्टही देण्यात आला आहे.

iQOO watch चे स्पेसीफिक्शन

  • मोठ्या गोल OLED डिस्प्ले व्यतिरिक्त, iQOO वॉचमध्ये अदलाबदल करण्यायोग्य पट्ट्या (वॉच बेल्ट )आहेत. याचा अर्थ युजर्स त्यांच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार त्यांचा वॉच बेल्ट बदलू शकतात.
  • स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड सपोर्ट आहेत.
  • फीचर्सच्या बाबतीतही हे प्रीमियम आहे.
  • त्यांचे स्वतःचे ॲप स्टोअर आहे आणि युजर्स यावरून त्यांचे आवडते ॲप डाउनलोड करू शकतात.

iQOO watch चे फीचर्स

  • iQOO वॉचचे वैशिष्ट्य असे आहे की ते बरेचसे ‘Vivo Watch 3’ सारखे दिसते.
  • यात 466 x 466 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.31 इंच OLED डिस्प्ले आहे.
  • नेहमी-ऑन डिस्प्ले (AOD) देखील सपोर्टेड आहे.
  • सुरळीत कामगिरीसाठी, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन वेअर 4100 प्लस चिपसेट देण्यात आला आहे.
  • रोटेटिंग क्राऊनआणि बटणांद्वारे नेव्हिगेशन सोपे केले जाते.

iQOO watch ची कनेक्टिव्हिटी

  • कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, ब्लूटूथ आणि वाय-फाय ते GPS, NFC आणि eSIM सारखे पर्याय यात उपलब्ध आहेत.
  • हेल्थ चेकअपसाठी, घड्याळात हार्ट स्पीड मॉनिटर, SpO2 मॉनिटर आणि स्लीप ट्रॅकिंग सारखे पर्याय प्रदान करण्यात आले आहेत.
  • वॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड प्रोव्हाईड केले आहेत.
  • ॲपद्वारे युजर्स त्यांचा हेल्थ डेटा कुटुंबासह शेअर करू शकतात.
  • eSIM सह सहज कॉल करणे आणि NFC द्वारे अनलॉक करणे यासारखी फीचर्स देखील यामध्ये उपलब्ध आहेत.

iQOO watch चे चार्जिंग

कंपनीच्या म्हणण्यानुसार, एकदा घड्याळ पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर, युजर्सना ब्लूटूथ मोडमध्ये (16 दिवस पॉवर सेव्हिंग मोडमध्ये) 8 दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल. तर eSIM प्रकार पूर्ण चार्ज झाल्यावर 3 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देऊ शकते (पॉवर सेव्हिंग मोडमध्ये 7 दिवस). हे घड्याळ नुकतेच चीनमध्ये लॉन्च केले गेले आहे आणि सध्या कंपनीने भारतात लॉन्च करण्याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

Source link

iQOOsmart watchvivoआयक्यूओओव्हीव्होस्मार्ट वॉच
Comments (0)
Add Comment