पैसे देऊन देखील दिसत आहेत जाहिराती
JioCinema नं नवीन प्लॅन्स लाँच करताना माहिती दिली होती की त्यांच्या अॅड फ्री प्रीमियम प्लॅन्स मध्ये चित्रपट, टीव्ही शो, वेब सीरीज आणि इतर कंटेंटवर जाहिराती दिसणार नाहीत. परंतु खेळांचे सामने आणि लाइव्ह टीव्ही स्ट्रीमिंगवर जाहिराती असतील.
परंतु कंपनीनं हे सांगितलं नव्हतं की अॅड फ्री प्लॅन्स म्हणजे फक्त व्हिडीओ अॅड्स दिसणार नाहीत. ही माहिती JioCinema च्या Help पेजवर पाहायला मिळते की लाइव्ह कंटेंटवर अॅड्स दिसतील तसेच Ad-Free प्लॅनमध्ये फक्त व्हिडीओ अॅड्स दिसणार नाहीत परंतु बॅनर अॅड्स दिसतील.
बॅनर अॅड अॅप मध्ये कायम
जाहिराती JioCinema च्या होम पेजवर प्रामुख्याने दिसत आहेत. तसेच इतर काही सेक्शनमध्ये देखील बॅनर अॅड दिसत आहेत. याची तक्रार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर युजर्सनी केली आहे. त्यांच्या मते सब्सक्रिप्शन खरेदी केल्यावर देखील त्यांना जाहिराती दिसत आहेत.
युजर्सनी जिओ सिनेमाच्या अॅड-फ्री प्लॅन्सना फसवे म्हटलं आहे. तसेच प्लॅटफॉर्मनं याबाबत सब्सक्रिप्शन खरेदीच्या वेळी ही माहिती दिली नसल्याचा दावा देखील केला आहे. जी माहिती सब्सक्रिप्शन पेजवर हवी ती ती माहिती जिओ सिनेमाच्या हेल्प पेजवर दिसत आहे.
नवीन प्लॅन्सची किंमत बदलणार
जिओनं २९ रुपये आणि ८९ रुपयांचे दोन प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही प्लॅन्सची वैधता ३० दिवस आहे. विशेष म्हणजे ही किंमत लाँच ऑफर अंतगर्त ठेवण्यात आली आहे, कालांतराने यांची किंमत अनुक्रमे ५९ आणि १४९ रुपये केली जाईल. याआधी लाँच करण्यात आलेला ९९९ रुपयांचा प्लॅन एक वर्षभराचा अॅक्सेस देतो.