एअरटेलचा 148 रुपयांचा ओटीटी प्लॅन
एअरटेलच्या 148 रुपयांच्या प्लॅन कोणतेही रिचार्ज ॲक्टिव्ह असतांना देखील करता येईल. तुम्हाला सध्याच्या प्लॅनची व्हॅलिडिटी संपण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही कारण या 148 रुपयांच्या रिचार्जमुळे अतिरिक्त डेटाचा लाभ मिळणार आहे. केवळ डेटाशी सबंधित असल्यामुळे या प्लॅनसोबत कॉलिंग व एसएमएसची सुविधा मिळणार नाही. शिवाय यात 28 दिवसांसाठी Airtel Xstream Play वर मोफत एंट्री मिळेल. या रिचार्जमध्ये 20 पेक्षा अधिक OTTचा लाभ घेता येणार आहे.
या प्लानसोबत मिळतील हे OTT ऍप्स
Airtel Xstream Play सह 28 दिवसांसाठी काही प्रमुख ऍप्प्सचे सबस्क्रिप्शन मिळेल या OTT च्या यादीत SonyLIV ते Lionsgate Play चा समावेश आहे. याशिवाय फॅनकोड, इरॉस नाऊ, होइचोई, मनोरमामॅक्स आणि इतर सेवांचे शो, वेब सिरीज आणि चित्रपट मोबाईल, टॅबलेट किंवा टीव्ही स्क्रीनवर स्ट्रीम करता येणार आहे.
Airtelचा 359 रुपयांचा प्लॅन
एअरटेलचा हा प्लान 1 महिन्याच्या व्हॅलिडिटीसह मिळेल. यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2.5 जीबी डेटा मिळेल. 5G कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात राहणाऱ्या एअरटेल वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळेल. हा प्लॅन देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळेल. कंपनी या प्लॅनमध्ये Airtel Xstream Playचा मोफत वापर करता येईल. तसेच, 20 पेक्षा जास्त OTT ऍप्सचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
Airtelचा 399 रुपयांचा प्लॅन
Airtelच्या या प्लॅनचा लाभ 28 दिवसांसाठी घेता येईल . यामध्ये कंपनी दररोज 3 जीबी इंटरनेट डेटा देत आहे. जर तुम्ही Airtel 5G कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात राहत असाल तर तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळेल. दररोज 100 मोफत एसएमएस देणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल. कंपनीचा हा प्लॅन 20 पेक्षा जास्त OTT ॲप्सच्या ऍक्सेससह Airtel Xstream Play च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल .