‘या’ टेक्नॉलॉजीमुळे Vivo चे फोटो जास्त चमकतील; अधिकाऱ्यानेच सांगितलं सिक्रेट

विवोनं आपली लेटेस्ट कॅमेरा टेक्नॉलॉजी BlueImage लाँच केली आहे. कंपनीच्या अपकमिंग स्मार्टफोनच्या कॅमेरा सिस्टममध्ये ही BlueImage इमेजिंग टेक्नॉलॉजी दिली जाईल. कंपनी सर्वप्रथम या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या फ्लॅगशिप Vivo X100 Ultra स्मार्टफोनमध्ये शकते.

BlueImage imaging टेक्नॉलॉजी म्हणजे काय?

BlueImage इमेजिंग टेक्नॉलॉजी बद्दल विवोचे ब्रँडिंग व्हॉइस प्रेसिडेंट Jia Jingdong यांनी सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या मते ही टेक्नॉलॉजी फोटोग्राफी दरम्यान सतत येणाऱ्या समस्या चुटकीसरशी सोडवू शकते.

या टेक्नॉलॉजीमुळे युजर्स बॅकलाइटिंग आणि लो-लाइट कंडीशनमध्ये देखील टेलीफोटो लेन्सच्या माध्यमातून चांगले फोटो क्लिक करू शकतील. सध्या कंपनीनं आपल्या इमेजिंग टेक्नॉलॉजी बद्दल जास्त माहिती शेयर केली नाही.

मीडिया रिपोर्ट्स मध्ये दावा केला जात आहे की Vivo ची ही इमेजिंग टेक्नॉलॉजी V-सीरीज इमेजिंग चिपमध्ये इंटीग्रेट केली जाऊ शकते. ही चिप कंपनीनं साल २०२१ मध्ये पहिल्यांदा बाजारात आणली होती. Vivo X100 सीरीजमध्ये कंपनी या चिपचा लेटेस्ट व्हर्जन Vivo V3 इमेजिंग चिपसह सादर करू शकते.

Vivo X100 Ultra चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Vivo X100 Ultra स्मार्टफोनबद्दल बातमी आहे की हा चीनमध्ये मे महिन्यात सादर केला जाऊ शकतो. हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल. आगामी Vivo X100 Ultra स्मार्टफोनबद्दल बरीच माहिती आतापर्यंत समोर आली आहे.

अपकमिंग Vivo X100 Ultra स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचा 200MP चा कॅमेरा सेन्सर दिला जाईल, जो अद्याप रिलीज करण्यात आला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा १/१.४-इंच ISOCELL HP9 सेन्सर आहे. या कॅमेऱ्याचा अपर्चर एफ/२.५९ आहे. विवो हा कॅमेरा सेन्सर Vivo X100 Pro स्मार्टफोनमध्ये देखील वापरू शकते.

Vivo X100 Ultra स्मार्टफोनबद्दल आलेल्या लीक रिपोर्ट्स मध्ये दावा केला जात आहे की यार Samsung E7 AMOLED 2K स्क्रीन दिली जाऊ शकते. त्याचबरोबर विवोच्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट दिला जाईल. हा फोन ५०००एमएएचची बॅटरी आणि ५०वॉट वायरलेस आणि १००वॉट वायर्ड चार्जिंगचा सपोर्ट दिला जाईल.

Source link

blueimage imagingvivo blueimage imagingvivo camera technologyविवो कॅमेरा टेक्नॉलॉजीविवो कॅमेरा फोनविवो फोन
Comments (0)
Add Comment