न्यूजचेकरने या व्हायरल व्हिडिओची पडताळणी केली. या व्हिडिओच्या पडताळणीत व्हिडिओच्या की-फ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च करण्यात आल्या. या तपासणीत अनेक मीडिया रिपोर्ट्स समोर आले. या रिपोर्ट्समध्ये ज्या व्यक्ती शाहरुख खान म्हटलं जात आहे, तो शाहरुख सारखाच दिसणारा इब्राहिम कादरी असल्याचं समोर आलं.
१९ एप्रिल २०१४ रोजी इंडियन एक्सप्रेसद्वारा प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं, की बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानसारख्याच दिसणाऱ्या इब्राहिम कादरीने सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार रॅलीदरम्यान काँग्रेसला समर्थन देत प्रसिद्धीझोतात आले.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही सांगण्यात आलं, की सोलापूरमध्ये शाहरुख खानसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने प्रचारसभेत एन्ट्री केल्यानंतर भाजपने यावर आक्षेप घेतला होता.
शाहरुख खानचा डुप्लीकेट अर्थात शाहरुखसारख्याच दिसणाऱ्या इब्राहिम कादरीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रचार सभेतील व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये त्याने घातलेले कपडे, चष्मा, प्रचार सभेची गाडी आणि काँग्रेसचे झेंडे व्हायरल व्हिडिओप्रमाणेच आहेत.
निष्कर्ष
शाहरुख खानने काँग्रेससाठी प्रचार केल्याचा व्हायरल व्हिडिओतील दावा पूर्णपणे खोटा आहे. न्यूजचेकरने केलेल्या पडताळणीत हे स्पष्ट होतं, की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती शाहरुख खान नाही, तर त्याच्या सारखाच दिसणारा इब्राहिम कादरी आहे. इब्राहिम कादरीने काँग्रेसच्या समर्थनार्थ प्रचार केला होता.
(This story was originally published by NewsChecker, and republished by MT as part of the Shakti Collective.)