Pune Road Accident: आईचा अपघाती मृत्यू, वडील रुग्णालयात; पैशांची जुळवाजुळव करताना तरुणावर काळाचा घाला

हायलाइट्स:

  • वडिलांवर उपचारासाठी पैशाची जुळवाजुळव करताना अपघात.
  • पुण्यातील लोणीकंद भागात तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू.
  • आठ दिवसांपूर्वीच अपघातामध्ये आईचा झाला होता मृत्यू.

पुणे: आठ दिवसांपूर्वी आई-वडिलांचा अपघात झाला. त्यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. वडील गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी मुलगा धावाधाव करत होता. तो नातेवाईकांकडे पैसे आणण्यासाठी जात असताना सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची वाघोली येथे धडक बसून त्याचा देखील जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ( Pune Road Accident Latest News )

वाचा: गणेशोत्सवानंतर राज्यात निर्बंध कधीपर्यंत; सरकारने हायकोर्टात केलं स्पष्ट

सागर शंकर वाघमारे (वय २०, रा. खुळेवाडी, चंदननगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी गहिनीनाथ बोयणे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक रमेश नंदकुमार साठे (वय २४, रा. सुतारवाडी रस्ता, पाषाण) याला अटक करण्यात आली आहे. पुणे-नगर रस्त्यावर वाघोली येथे पुण्याकडे येणाऱ्या लेनवर शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला, अशी माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार यांनी दिली.

वाचा: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; राज्यात ऑक्सिजनबाबत गाइडलाइन्स जारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा शिक्षण घेत आहे. त्याच्या आई-वडिलांचा आठ दिवसांपूर्वीच शिरूरजवळ अपघात झाला होता. यामध्ये त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी असल्यामुळे त्यांच्यावर कात्रज परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी सागर पैशाची जुळवाजुळव करत होता. नातेवाईकांकडे पैसे आणण्यासाठीच शुक्रवारी तो वाघोली परिसरात आला होता. वाघोली येथे पुण्याकडे येणाऱ्या लेनवर महालक्ष्मी स्टील दुकानाजवळ सळ्या घेऊन निघालेला ट्रक कोणतीही दिशा न दाखविता रस्ता ओलांडण्यासाठी आचानक वळला. त्यावेळी सागर हा वेगात ट्रकच्या पाठीमागील कोपऱ्याला असलेल्या अँगलवर जाऊन धडकला. तो अँगल सागरच्या चेहऱ्यावर लागल्यामुळे त्याचा चेहरा मधोमध चिरला गेला. तो दुचाकीसह दूर अंतरावर फेकला गेला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे तपास करत आहेत.

वाचा: करोनाबाबत दिलासा देणारे अपडेट्स; ‘ही’ आहे राज्यातील आजची आकडेवारी

Source link

Pune Accident Newspune latest accident newspune lonikand accident newspune road accident latest newsyouth dies in accident in puneगजानन पवाररमेश नंदकुमार साठेलोणीकंद पोलीसवाघोलीसागर शंकर वाघमारे
Comments (0)
Add Comment