फोनसोबत कंपनीनं एक बंडल ऑफर देखील सादर केली आहे. हा फोन खरेदी करणाऱ्या युजर्सना कॉम्बो ऑफरमध्ये गॅलेक्सी वॉच ६ वर ४ हजार रुपयांचा इंस्टंट कार्ट डिस्काउंट आणि HDFC बँकेच्या कार्डनं पेमेंट केल्यास ८ हजार रुपयांचा अडिशनल इंस्टंट डिस्काउंट मिळेल. विशेष म्हणजे कंपनीचा हा फोन तुम्ही ३५ हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह देखील विकत घेऊ शकता. परंतु एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारा अॅडिशनल डिस्काउंट तुमच्या जुन्या फोनच्या कंडीशन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबुन असेल.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनीचा हा फोन ८जीबी पर्यंतच्या रॅम आणि ५१२जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट मिळेल. फोनचा डिस्प्ले ६.१ इंचाचा आहे. हा फुल एचडी+ डायनॅमिक अॅमोलेड २एक्स डिस्प्ले १२०हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याचा टच सॅम्पलिंग रेट २४०हर्ट्झ आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
यात ५० मेगापिक्सलच्या वाइड अँगल कॅमेऱ्यासह एक १२ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा आणि एक १० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये तुम्हाला १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ३९०० एमएएचची आहे. ही बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन अँड्रॉइड १३ आधारित वनयुआय ५.१ वर चालतो.