पहाडी बालकांना वाढ खुंटण्याचा धोका; संशोधनातील निष्कर्षांच्या आधारे काय म्हणते संशोधन?

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारताच्या पर्वतीय, तसेच टेकड्यांच्या भागात राहणाऱ्या बालकांमध्ये वाढ खुंटण्याचा धोका अधिक असतो, तसेच समुद्रसपाटीपासून उंची जेवढी अधिक त्याप्रमाणात हा धोका वाढत जातो, असे निष्कर्ष अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या संशोधनात मांडण्यात आले आहेत. ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल न्यूट्रिशन, प्रीव्हेन्शन अँड हेल्थ’ या विज्ञानपत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

असा केला अभ्यास

– पाच वर्षांखालील वयोगटातील १.६५ लाख बालकांच्या माहितीचे विश्लेषण

– जागतिक आरोग्य संघटनेचे निकषांनुसार वाढ खुंटण्याची व्याख्या निश्चित

– राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६च्या डेटाचा आधार

– मणिपाल अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनमधील तज्ज्ञांचा संशोधकांच्या पथकात सहभाग

काय म्हणते संशोधन?

– पालकांचे तिसरे किंवा त्यापुढील अपत्य असलेल्या मुलांमध्ये वाढ खुंटण्याचा धोका अधिक, म्हणजेच ४४ टक्के.

– पहिले अपत्य असलेल्यांमध्ये हे प्रमाण ३० टक्के

– जन्मावेळी लहान आकाराच्या बालकांमध्ये वाढ खुंटण्याचे प्रमाण ४५ टक्के

– समुद्रसपाटीपासून १,००० मीटर उंचीवर राहणाऱ्या बालकांच्या तुलनेत २,००० मीटर उंचीवर राहणाऱ्या बालकांमध्ये वाढ खुंटण्याचे प्रमाण

४० टक्के अधिक

प्रमुख निरीक्षणे

– सातत्याने अधिक उंचीच्या प्रदेशात राहिल्यामुळे भूक मंदावते, ऑक्सिजन कमी मिळतो, पोषक घटक शोषून घेण्यावर मर्यादा येतात.

– अर्थात ही निरीक्षणे असून त्यांचा थेट संबंध सिद्ध करता आलेला नाही.

प्रमुख आव्हाने

– कमी शेतीउत्पादन, प्रतिकूल हवामान यांमुळे डोंगराळ भागात अन्न असुरक्षेचा धोका मोठा.

– या भागात आरोग्यसेवा पुरवणे, पोषण आहार कार्यक्रम राबवणे ही आव्हाने.

वाढ खुंटण्याचे प्रमाण

३६ टक्के

१.५ ते ५ वर्षे

४१ टक्के

१.५ वर्षांखालील

२७ टक्के

मातेचे शिक्षण हा कळीचा मुद्दा

– मातेचे शिक्षण अधिक तेवढे बालकांची वाढ खुंटण्याचे प्रमाण कमी असल्याचे निरीक्षण

– प्रसूतीपश्चात काळजी, क्लिनिक भेटी, लसीकरण, पूरक घटक, आरोग्य सुविधांच्या जवळ वास्तव्य हे घटक महत्त्वाचे ठरतात

अभ्यासकांच्या शिफारशी

– पुनरुत्पादन आरोग्यासाठी उपक्रम, महिलांसाठी पोषण आहार कार्यक्रम, अर्भके आणि लहान बाळांच्या आहाराकडे लक्ष, अन्नसुरक्षा उपाययोजना

– सातत्यपूर्ण संशोधन, देखरेख, मूल्यमापन याद्वारे योग्य धोरणे आणि कृती

Source link

children groming tipschildren growth tipschildren health tipsmountain residentnew delhi newswho - world health organizationजागतिक आरोग्य संघटनानवी दिल्ली न्यूजब्रिटिश मेडिकल जर्नल न्यूट्रिशनराष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण
Comments (0)
Add Comment