अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात भारतीयाचा मृत्यू, ‘हिट अ‍ॅंड रन’ प्रकरणात अटक करताना घटना

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : अमेरिकेतील टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथे पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्यांना धडक दिल्याने पोलिसांनी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला गोळ्या घालून ठार केले. घरगुती हिंसाचारप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करण्याच्या दरम्यान २१ एप्रिलला हा प्रकार घडला.

काय घडलं?

सचिनकुमार साहू (वय ४२) असे मृताचे नाव आहे. टायलर टर्नर या पोलिस अधिकाऱ्याने झाडलेल्या गोळीत साहू यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. साहू मूळ उत्तर प्रदेशचे रहिवासी असून, ते अमेरिकेचा नागरिक असू शकतात, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

सॅन अँटोनियो पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती २१ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी ५१ वर्षीय महिला गाडीने धडक दिल्याने जखमी अवस्थेत आढळली. संशयित साहू तेथून फरारी झाला होता. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर फरारी साहूविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले.

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला भागात चकमक; दोन दहशतवादी ठार, तर दोन जवान जखमी
काही तासांनंतर साहू परतल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. मात्र, पोलिस आल्यानंतर साहूने त्यांच्या वाहनांना धडक देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर टायलर टर्नर या अधिकाऱ्याने साहूला रोखण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला; त्यातच त्याचा मृत्यू झाला. एका जखमी अधिकाऱ्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आणि दुसऱ्या अधिकाऱ्यावर घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेदरम्यान इतर कोणीही जखमी झाले नाही. हा तपास सुरूच असल्याचे पोलिसांनी सांगितले.

परभणीत मध्यरात्री राडा! शिवसैनिकांनी महादेव जानकरांची गाडी अडवली, पीए अन् ड्रायव्हरला धमकावलं

साहूची पूर्वाश्रमीची पत्नी लीह गोल्डस्टीनने ‘केन्स डॉट कॉम’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, साहूला द्विध्रुवीय विकार (बायपोलर डिसऑर्डर) असल्याचे निदान झाले होते. गेल्या दहा वर्षांपासून तो याने त्रस्त होता; तसेच त्याला स्किझोफ्रेनियाची लक्षणे देखील होती.

Source link

bipolar disorderhit and run caseindian killed in americaIndian Origin Man Shot By US Policeinternational news
Comments (0)
Add Comment