AC गॅरंटी काळात असूनही कंपनी दुरुस्तीसाठी पैसे मागतेय? तर अशी करा तक्रार

उन्हाळ्यातील उषणतेपासून बचाव करण्यासाठी एअर कंडिशनर चांगला गारवा देतो, ज्यांच्याकडे एअर कंडिशनर नाही ते नवीन एसी घेण्याचा विचार करत आहेत. ज्यांच्याकडे आधीच एसी आहे त्यांनी त्यांचा एसी सर्व्हिस आणि गॅस रिफिल करायला सुरुवात केली आहे. जर तुम्हीही एसी यूजर असाल तर आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.

कोणताही नवीन एअर कंडिशनर खरेदी केल्यावर कंपनीकडून गॅरंटी आणि वॉरंटी दिली जाते. ज्यामध्ये वेगवेगळ्या पार्ट्सची वॉरंटीचा समावेश असतो. याशिवाय काही कंपन्या मर्यादित कालावधीसाठी गॅस गळती झाल्यास गॅस मोफत भरण्याची गॅरंटी देखील देतात. जर तुमचा एसी अशा प्रकारच्या असेल आणि तरीही कंपनी तुमच्याकडून पैसे घेत असेल, तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता.

आपण कुठे तक्रार करू शकतो ?

गॅरंटी आणि वॉरंटी असूनही एसी दुरुस्त करण्यासाठी एसी कंपनी पैसे घेत असेल, तर तुम्ही त्याबाबत तक्रार करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला एसी कंपनीविरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करावी लागणार आहे. जिथे सुनावणीनंतर निर्णय तुमच्या बाजूने आला तर कंपनीला नक्कीच दंड ठोठावला जाईल. यासोबतच तुम्हाला एसी दुरुस्तीचे शुल्कही परत करावे लागेल.

तक्रार कोणत्या आधारावर केली जाईल?

जर तुम्ही नवीन एअर कंडिशनर खरेदी करत असाल तर तुम्हाला एसीची गॅरंटी आणि वॉरंटी बद्दलच्या लिखित डिटेल्स जमा कराव्या लागतील. ज्याच्या आधारे तुम्ही एसी कंपनी आणि सर्व्हिसप्रोवयरड रविरुद्ध ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करू शकता. तुमच्याकडे आवश्यक आणि योग्य कागदपत्रे नसल्यास ग्राहक न्यायालयातील निर्णय तुमच्या बाजूने येणार नाही.

एसी कंपनीला दंड ठोठावला

एका प्रकरणावर सुनावणी करताना भोपाळमधील ग्राहक न्यायालयाने एसी कंपनीला ३१,२१२ रुपये, एसी दुरुस्तीसाठी ५,५०० रुपये आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल ८,००० रुपये दंड ठोठावला आहे. वास्तविक, भोपाळमधील एका व्यक्तीने 2020 मध्ये एक एसी खरेदी केला होता, ज्याची किंमत 31212 रुपये होती. या एसीमध्ये 10 वर्षांची कंप्रेसर वॉरंटी, 5 वर्षांची पीसीबी वॉरंटी आणि 5 वर्षांच्या कंडेन्सरसह मोफत गॅस भरण्याची गॅरंटी होती. पण जेव्हा एसी खराब झाला तेव्हा कंपनीच्या सर्व्हिस प्रोव्हायडरने एसी दुरुस्त करण्यासाठी यूजरकडून 5500 रुपये घेतले आणि त्यानंतर पुन्हा एसी खराब झाल्यावर आणखी पैशांची मागणी करण्यात आली. त्यानंतर एसी यूजरने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. ज्यामध्ये ग्राहक न्यायालयाने ग्राहकाच्या बाजूने निकाल दिला.

Source link

AC in guarantee periodAC warrantyair conditionercompany chargescustomer complaintservice providerएअर कंडिशनर
Comments (0)
Add Comment