या जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस; नदीच्या पुरात अनेक जनावरे गेली वाहून

हायलाइट्स:

  • अकोल्यात पावसाचा हाहाकार
  • ढगफुटी सदृश पावसाचे थैमान
  • अनेक जनावरे गेली वाहून

अकोलाः बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या प्रणालीचे शनिवारी संध्याकाळी चक्रीवादळात रूपांतर झाले. त्यामुळं राज्यातही अलर्ट जारी करण्यात आलं आहे. अकोला जिल्ह्यातही पावसानं हाहकार माजवला आहे. जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसामुळं निर्गुणा नदीला पुर आला आहे. तर, या नदीच्या पुरात अनेक जनावरे वाहून गेले आहेत.

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चोंडी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. त्यामुळं नदीला मोठा पुर आला असून या पुराच्या पाण्यात अनेक जनावरे वाहून गेले आहेत. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात नदीच्या पाण्यात म्हशी वाहून जाताना दिसत आहेत. जवळपास ३० ते ३५ जनावरे वाहून गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वाचाः गुल-आब चक्रीवादळामुळं राज्यात पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

येत्या काही तासांत पुराचे पाणी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं निर्गुणा नदीवरील काठावर असलेल्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, गुल- आब चक्रीवादळामुळं राज्यातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती येथे सोमवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव येथे मंगळवारी ऑरेंज अॅलर्ट आहे. या काळात तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल.

Source link

cloudburst at akolacyclone gulabgulab cycloneheavy rains in akolaअकोलाचक्रीवादळ
Comments (0)
Add Comment