हायलाइट्स:
- मुंबईत भायखळा जेलमध्ये करोनाचा शिरकाव
- तब्बल ३९ कैद्यांना करोनाची लागण
- गर्भवती महिला, मुलांचाही समावेश
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात येत आहे. मात्र, मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भायखळा तुरुंगातील (byculla jail) ३९ जणांना करोनाची लागण झाली आहे. भायखळ्यात महिलांसाठी असलेल्या तुरुंगात गेल्या १० दिवसांत सहा मुलांसह ३९ जणांना करोना झाला आहे. (Mumbai Coronavirus)
१७ सप्टेंबर रोजी कारागृहातील अनेक कैद्याना ताप येत असल्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागाला देण्यात आली होती. त्यानंतर पालिकेकडून तिथे शिबीर घेण्यात आलं. सर्व कैद्यांची तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या १२० हून अधिक करोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या. ज्यातून एकूण ३९ कैद्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहेत. यात सहा मुलांचा व एका गर्भवती महिलाचेही समावेश आहे. या महिलेवर जीटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. तर, अन्या कैद्यांना माझगाव परिसरातील पाटणवाला नगरपालिकेच्या शाळेत क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
वाचाः ‘या’ जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस; नदीच्या पुरात अनेक जनावरे गेली वाहून
कारागृहात एकाचवेळी ३९ कैदी करोनाबाधित झाल्याने खळबळ माजली आहे. कारागृहात परतलेल्या एका कैद्याला करोना झाल्यानं अन्य कैद्यांनाही लागण झाली असावी, अशी शक्यता महापालिकेच्या अधिकाऱ्यांने व्यक्त केली आहे. तसंच, भायखळा कारागृहातील तो परिसर अधिकाऱ्यांनी सील केला आहे.
वाचाः … तेथे शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार?; शिवसेनेचा सवाल
दरम्यान, मुंबई महापालिका हद्दीत शनिवारी ४५५ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. मुंबईत आजपर्यंत करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या सात लाख ४० हजार ७६० इतकी झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत पाच करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, करोनामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण मृत्यू संख्या १६ हजार ७९ इतकी झाली आहे.
वाचाः गुल-आब चक्रीवादळामुळं राज्यात पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट