हायलाइट्स:
- राजू शेट्टींनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट
- अलमट्टी धरणासंदर्भात घेतली भेट
- मुख्यमंत्र्यांसोबत केली चर्चा
कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्र व बेळगांव जिल्ह्याच्या महापूरास कारणीभूत असणाऱ्या अलमट्टी धरणांची उंची वाढविण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली. शेट्टी यांनी अलीकडेच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavaraj bommai) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुराच्या विविध कारण आवर व उपाय याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
मुख्यमंत्री बोम्मई यांनी महापुराच्या समस्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून पुलांचे भराव कमी करून कमानी उभारणी करून पाणी प्रवाहित केले जाईल. तसेच महापुर नियंत्रणासाठी अभ्यासगट नेमून त्याबाबत उपाययोजना करत असून कर्नाटक सरकारकडून केंद्रीय जल आयोगाकडेही याबाबत पत्रव्यवहार केले असल्याची माहिती दिली.
वाचाः भायखळा कारागृहात खळबळ; ३९ कैद्यांना करोनाची लागण
शेट्टी म्हणाले, ‘कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नद्यावर जे पूल बांधलेले आहेत. त्या अनेक पूलाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर भराव आहे. महापूर काळामध्ये नदी पाञापासून दोन – दोन किलोमीटर पाणी पसरते अशा काळात हे पूल बंधा-याचे काम करतात म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते. महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑगस्टपर्यंत अलमट्टीची पाणीपातळी ५१२ मीटर ठेवावी, असं मत राजू शेट्टींनी मांडलं आहे.
वाचाः ‘या’ जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस; नदीच्या पुरात अनेक जनावरे गेली वाहून
सध्या कृष्णा नदीवर महाराष्ट्र हद्दीपासून ते हिप्परगी धरणापर्यंत मोठे ६ पूल, हिरण्यकेशी नदीवर महामार्गावरील ५ पूल व दुधगंगा – वेदगंगा नदीवरील पूलांचे भराव महापुरास कारणीभूत ठरत असून चिकोडी तालुक्यांतील अंकली – मांजरी पुलाच्या भरावामुळे शिरोळ, हातकंणगले , चिकोडी व निपाणी तालुक्यांतील पुरस्थिती गंभीर होत आहे. यामुळे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणांची उंची न वाढविता कृष्णा, दुधगंगा , वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याची मागणी केली. यावेळी कर्नाटक राज्य व केंद्र सरकारचे समन्वयक मंत्री शंकरगौंडा, खासदार आण्णासाहेब ज्वोले, आमदार संजय पाटील, आमदार कल्लाप्पाणा मग्यान्नावर, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर आदी उपस्थित होते.
वाचाः ‘महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच केलीये’