मेष साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रवासातून यश प्राप्ती
मेष राशीच्या लोकांना आर्थिक विषयात हा आठवडा फार चांगला जाणार आहे. कार्यक्षेत्रात जुने, रखडलेले प्रोजेक्ट पुन्हा सुरू होतील. या आठवड्यात तुम्हाला कार्यक्षेत्रात मान, सन्मान मिळेल. कोर्ट, कचेरीच्या विषयात तुम्हाला यश मिळेल. या आठवड्यात केलेल्या प्रवासातून तुम्हाला यश मिळेल, तसेच फार चांगला अनुभव येईल. आर्थिक दृष्टिकोनातून वेळ अनुकूल आहे. धनवृद्धीचे शुभसंयोग घडत आहेत. आर्थिक विषयात या आठवड्यात तुम्हाला कोणाकडून तरी मदत मिळू शकते. कुटुंबात एखाद्या पितृतुल्य व्यक्तीमुळे चिंता सतावेल.
शुभ दिवस : 29,2
वृषभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : विचारपूर्वक गुंतवणूक करा
वृषभ राशीच्या लोकांना या आठवडा प्रगतीचा आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि तुम्हाला थोडे रिलॅक्स होऊन काम करता येईल, त्यामुळे चांगले परिणाम मिळतील. आर्थिक धनलाभाचे योग बनत आहेत. तुम्ही जितके विचारपूर्वक आणि संशोधन करून गुंतवणूक कराल तेवढी प्रगती होईल. प्रवासात तुमचे विचार खुलेपणाने मांडा म्हणजे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक विषयात निष्काळजीपणा केला तर तुम्हाला त्याची भरपाई करावी लागेल. आठवड्याच्या अखेरीस समस्या संवादाच्या मार्गाने सोडने योग्य राहील.
शुभ दिवस : 29,2
मिथुन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : आरोग्याकडे लक्ष द्या
मिथुन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रवासाचे योग आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामात सकारात्मक फळ मिळेल. आपापसांतील प्रेम वाढेल आणि आठवडा आनंदात जाईल. कार्यक्षेत्रात असुरक्षेची भावना जागृत होईल आणि अस्वस्थता वाढू शकते. आर्थिक पातळीवर सुधारणा होईल. आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अचानक काही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. निष्काळजीपणा केला तर दीर्घकाळ आजारी राहाल. आठवड्याच्या अखेरीस काही कष्ट वाढतील.
शुभ दिवस : 2
कर्क साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य – विचारपूर्वक निर्णय घ्या
कर्क राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात कार्यक्षेत्रातील स्थिती उत्तम राहील. या आठवड्यात सुरू केलेली कामे भविष्यात सुंदर योग घेऊन येतील आणि यशाचे मार्ग प्रशस्त होतील. या आठवड्यात पैशाच्या देवाणघेवाणीत जे काही निर्णय घ्याल, ते अत्यंत निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावेत, नाही तर भविष्यात नुकसान होऊ शकते. कुटुंबाच्या बाबाती काही सुधारणा होतील. या आठवड्यात प्रवास टाळता आला तर आवश्य टाळावा. आर्थिक विषयांकडे लक्ष द्यावे, अन्यथा आकस्मिक आर्थिक नुकसान होऊ शकते. आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती तुम्हाला अनुकूल होईल.
शुभ दिवस : 28,30,3
सिंह साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : यशाचा मार्ग खुला होईल
सिंह राशीसाठी आर्थिक विषयांत हा आठवडा फार शानदार ठरणार आहे. ज्या व्यक्तीची आर्थिक स्थिती उत्तम आहे, अशी व्यक्ती तुमची मदत करेल. प्रवास साधारण राहील, पण प्रवास टाळला तरी फार काही नुकसान होणार नाही. काही विषयांमुळे तुमचे मन असंतुष्ट राहील. कामाच्या ठिकाणी भावनिकतेमुळे त्रास होऊ शकतो. आर्थिक खर्च या आठवड्यात जास्त होतील. या आठवड्यात केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे तुमच्यासाठी यशाचा मार्ग खुला होईल.
शुभ दिवस : 29,30
कन्या साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रवास टाळा
कन्या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल आहे आणि तुम्हाला धनलाभाच्या संधी मिळतील. एखाद्या नव्या गुंतवणुकीबद्दल मनात साशंकता राहील, पण जर तुम्ही धाडस करून गुंतवणूक केली तर चांगले परिणाम मिळतील. या आठवड्यात प्रवासातून त्रास होऊ शकतो, त्यामुळे प्रवास टाळणे योग्य राहील. कुटुंबाच्या बाबतीत कोणाताही महत्त्वाचा निर्णय या आठवड्यात टाळणे योग्य राहील. नातेसंबंधात तणाव राहील. आठवड्याच्या अखेरीस नवी सुरुवात, तुमच्या जीवनात सुखसमृद्धीचे नवे मार्ग खुले होतील.
शुभ दिवस : 29,30,3
तूळ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : महिलेच्या मदतीने धनवृद्धी
तूळ राशीच्या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि तुमच्या कार्यशैलीत या आठवड्यात फार बदल होतील. जुने पॅटर्न हटतील आणि नवे पॅटर्न तुमच्या समोर येतील. करिअरमध्ये नवी दिशा मिळेल. धनवृद्धी होईल, या विषयात तुम्हाला एखाद्या महिलेची मदत मिळेल. कुटुंबात चोरी होण्याची शक्यता आहे. तसेच काही व्यक्तींसोबत अंतर वाढू लागेल किंवा काही नुकसान होऊ शकते. प्रवासातून लाभ मिळेल. आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती तुम्हाला अनुकूल होईल आणि जीवनात सुखशांतीचा अनुभव घ्याल.
शुभ दिवस : 29,3
वृश्चिक साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : कामावर लक्ष केंद्रित करा
वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक विषयात हा आठवडा यशाचा आहे, तसेच धनलाभाचे शुभ योग या आठवड्यात बनत आहेत. या आठवड्यात प्रवसातून यश प्राप्त होईल, पण हे यश तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असेल. कार्यक्षेत्रात असुरक्षेचे भावना राहील, त्यामुळे त्रास वाढेल. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या पितृतुल्य व्यक्तीमुळे चिंता राहील. या आठवड्यात पैशांती गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. कामावर लक्ष केंद्रित करावे.
शुभ दिवस : 29,2
धनू साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : आर्थिक विषयांत सुधारणा
धनू राशीच्या लोकांना या आठवडा उत्तम आहे. एखाद्या युवकाच्या मदतीने तुमची प्रकृती चांगली राहील. कुटुंबात एखादी नवी सुरुवात करण्याच्या दृष्टीने तुमच्या मनात संकोच राहील पण धाडस करून पुढे जाल तर तुम्हाला आवश्य यश मिळेल. प्रवासात नवीन विचार किंवा नवीन स्थानी केलेला प्रवास यशाचे मार्ग खुले करेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल, पण ही प्रगती तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी राहील. आर्थिक विषयांत सुधारणा होईल आणि धनलाभाची प्रबळ स्थिती राहील. धनवृद्धीत तुम्हाला एखाद्या महिलेची मदत मिळेल. आठवड्यात सुख आणि समृद्धीचे संयोग आहेत. जीवनात काही नवीन शिकून त्यावर अंमल केला तर जीवनात समाधान राहील.
शुभ दिवस : 28,30,1,3
मकर साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : धनवृद्धीची बातमी मिळेल
मकर राशीच्या लोकांना आर्थिक विषयात वेळ अनुकूल राहील. या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला धनवृद्धीची सुखद बातमी मिळेल. तुम्ही घेत असलेल्या कष्टामुळे भविष्यात सुंदर योग बनतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला एकटे वाटू शकेल. या आठवड्यात केलेल्या प्रवासांमुळे यशाचा मार्ग प्रशस्त होईल. कुटुंबाच्या बाबतीत वेळ अनुकूल राहील. आठवड्याच्या अखेरीस तुमच्या आळस जाणवू शकतो, त्यामुळे जीवनात कष्ट वाढतील.
शुभ दिवस : 29,30,2
कुंभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : मानसन्मान वाढेल
कुंभ राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि मानसन्मान वाढेल. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट संदर्भात सुखद बातमी मिळू शकते. महिलांना आर्थिक वृद्धीचे योग आहेत. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन कराल. पण या आठवड्यात प्रवास यशस्वी होण्यासाठी तुम्हाला भविष्योन्मुखी व्हावे लागेल. कुटुंबात काही महत्त्वाचे संघर्ष होऊ शकतात. आठवड्याच्या अखेरीस प्रिय व्यक्तींच्या सानिध्यात सुखद वेळ व्यतीत कराल.
शुभ दिवस : 28, 29, 3
मीन साप्ताहिक आर्थिक राशिफल : अस्वस्थ वाटेल
मीन राशीच्या लोकांना आर्थिक विषयांत आठवडा शुभ आहे आणि धनलाभाचे चांगले योग बनतील. धनवृद्धीत तुम्हाला एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची मदत मिळेल. जीवनात थोडे रिलॅक्स होणे योग्य होईल. कुटुंबात सुखसमृद्धीचे संयोग बनत आहेत, आणि तुम्ही कुटुंबातील धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. या आठवड्यात प्रवासातून शुभ संयोग बनत आहेत. आठवड्याच्या अखेरीस अस्वस्थ वाटेल. स्वतःचे विचार खुलेपणाने समोर ठेवणे योग्य राहील.
शुभ दिवस : 29,1,2,3