गेमिंग फोन ६०-७० हजार खर्च करण्याची गरज नाही; 12GB RAM सह आला परवडणारा मॉडेल

Infinix GT 20 Pro गेमिंग स्मार्टफोन कंपनीनं लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सौदी अरेबियात सादर करण्यात आला आहे. फोन गेल्यावर्षी आलेलया Infinix GT 10 Pro ची जागा घेईल. नव्या Infinix GT 20 Pro मध्ये C-शेप RGB लाइट डिजाइन देण्यात आला आहे. फोन खूप आकर्षक दिसतो. तसेच फोनमध्ये १२ जीबी रॅम देण्यात आली आहे. हा १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

Infinix GT 20 Proची किंमत

Infinix GT 20 Pro कंपनीनं दोन रॅम-स्टोरेज कंफिग्रेशन मध्ये लाँच केला आहे. बेस व्हेरिएंट ८ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेजसह येतो. दुसरा व्हेरिएंट १२जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेजसह येतो. याची किंमत SAR १२९९ (जवळपास २८,८०० रुपये) आहे. हा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. फोन Mecha Silver, Mecha Blue, आणि Mecha Orange कलर्स मध्ये सादर करण्यात आला आहे.

Infinix GT 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Infinix GT 20 Pro मध्ये ६.७८ इंच AMOLED डिस्प्ले आहे. यातील बेजल्स खूप पातळ आहेत, खासकरून बॉटम बेजल्सची जाडी फक्त २.१मिमी आहे. डिस्प्लेमध्ये FHD+ रिजॉल्यूशन आहे आणि १४४हर्ट्झ रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये १३०० निट्स पीक ब्राइटनेस मिळते. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

Infinix GT 20 Pro मध्ये Dimensity 8200 Ultimate चिपसेट कंपनीनं दिला आहे, सोबत १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज टाइप यूएफएस ३.१ आहे. हा फोन १२ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो. यात खास गेमिंग डिस्प्ले चिप Pixelworks X5 Turbo आहे. हा गेम ऑप्टिकल ऑप्टिमाइजेशन फीचरसह आला आहे. डिवाइस १२०fps पर्यंत गेमिंग फ्रेम रेट्सला सपोर्ट करतो.

इनफिनिक्सच्या या फोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी मिळते, त्याचबरोबर ४५वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोन अँड्रॉइड १४ आधारित एक्सओएस १४ वर चालतो. कंपनीनं या फोनला दोन अँड्रॉइड अपडेट आणि तीन सिक्योरिटी पॅच अपडेट देणार आहे. फोनमध्ये साउंडसाठी JBL ड्युअल स्पिकर आहेत.

कॅमेरा पाहता हा फोन मागे १०८एमपी कॅमेऱ्यासह येतो. सोबत २ मेगापिक्सलचे आणखी दोन सेन्सर आहेत. फ्रंटला डिवाइस ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात वायफाय ६, ब्लूटूथ, जपीएस, एनएफसी, आयात ब्लास्टर, यूएसबी सी पोर्टचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनला धूळ आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी यात आयपी५४ रेटिंग मिळते.

Source link

infinix gt 20 proinfinix gt 20 pro 5ginfinix gt 20 pro 5g priceinfinix gt 20 pro 5g specificationsinfinix gt 20 pro launchinfinix gt 20 pro priceइनफिनिक्स जीटी २० प्रोइनफिनिक्स फोनगेमिंग फोनस्वस्त गेमिंग फोन
Comments (0)
Add Comment