एसी खरेदी करण्याबाबत प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न असतात – जसे की किती स्टार रेटिंगचा एसी खरेदी करणे योग्य ठरेल? याशिवाय कोणत्या आकाराचा एसी घ्यावा, असे प्रश्न भेडसावत असतात. तसेच जास्त स्टार रेटिंगमुळे विजेची बचत होते का? असे मानले जाते की एसी खरेदी करताना, जास्त रेटिंगचा खरेदी केला पाहिजे कारण यामुळे वीज बचत होते.
या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
खोलीचा आकार
एसी नेहमी खोलीच्या आकारानुसार खरेदी करावा. जर तुम्ही खूप मोठा एसी घेतला तर विजेचा बेहिशोबी वापर होईल. जर तुम्ही खूप लहान असा एसी घेतला तर तो खोली थंड करू शकणार नाही.
किती स्टार रेटिंग असलेला एसी खरेदी करावा?
तुम्ही एसी खूप वापरत असाल तर तुम्ही जास्त स्टार रेटिंग असलेला एसी घ्या. यामुळे विजेची बचत आणि तुमच्या लाईट बिलावर अतिरिक्त बोजा पडणार नाही
जास्त स्टार रेटिंग असलेले AC उत्तम असतात का?
फक्त स्टार रेटिंगवर जाऊ नका. तसेच, इतर फिचर्स आणि किंमतीकडे बघायला हवे. इन्व्हर्टर एसी चांगला मानला जातो आणि नॉन-इनव्हर्टर एसीच्या तुलनेत इन्व्हर्टर एसी कमी वीज वापरतो. एसी खरेदी करताना वाय-फाय कंट्रोल, एअर फिल्टर आणि स्लीप मोड यांसारख्या काही खास फिचर्स असल्याची खात्री करावी.
BEEच्या वेबसाइटवर करा चेकिंग
तुम्ही ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी (BEE) च्या वेबसाइटवर AC ब्रँड आणि मॉडेल्सचे स्टार रेटिंग तपासू शकता https://beeindia.gov.in/en वर क्लिक करून अधिक माहिती मिळवू शकता.
या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
- जेव्हा तुम्ही खोलीत असता तेव्हाच एसी चालू करा.
- थर्मोस्टॅट 24°C किंवा त्याहून अधिक वर सेट करा.
- एसी चालू असताना पडदे आणि खिडक्या बंद ठेवा.
- एसी फिल्टर नियमित स्वच्छ करा.
- या टिप्स आणि युक्त्या फॉलो करून तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य स्टार रेटिंग एसी निवडू शकता आणि विजेची बचत करू शकता.