भीषण! उभ्या मिनी ट्रकला धडक, ३ चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील ८ जणांचा अंत, २३ जखमी

बेमेतरा: दोन गाड्यांच्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलं आणि पाच महिलांचा समावेश आहे. तर या घटनेत २३ जण जखमी झाले आहेत. यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांना रायपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर इतरांचा उपचार बेमेतरा आणि सिमगा येथील रुग्णालयांमध्ये सुरु आहे.

पिकअप गाडीच्या झालेल्या या अपघातावेळी गाडीमध्ये ४० ते ५० जण असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात छत्तीसगडच्या बेमेतरा येथे झाला. गाडीवर सर्व हे एका कार्यक्रमावरुन परतत असताना हा अपघात झाला. कार्यक्रमावरुन परतत असताना जेव्हा त्यांची गाडी ही ग्राम कठिया येथे पोहोचली, तिथे त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. हे सर्व ग्राम पथर्रा येथील राहणारे होते. सध्या जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी रात्री उशीरा झाला. कठिया गावाजवळ हा अपघात झाला असून एका कौटुंबिक कार्यक्रमातून परतताना हा अपघात घडला. एक मालवाहू वाहन रस्त्याच्या शेजारी उभ्या मिनी ट्रकला जाऊन धडकला आणि हा अपघात घडला.

नवले पुलाजवळ विचित्र अपघात, आठ ते नऊ वाहनांची धडक

मृतांमध्ये भूरी निषाद (वय ५०), नीरा साहू (५५), गीता साहू (६०), अग्निया साहू (६०), खुशबू साहू (३९), मधु साहू (५), रिकेश निषाद (६) आणि ट्विंकल निषाद (६) यांचा समावेश आहे. तर जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. पण, या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Source link

bemetara road accidentchhattisgarh newslatest news in marathiroad accidentroad accident in bemetararoad accident news todayआजच्या बातम्याछत्तीसगड अपघातमराठी बातम्यारस्ते अपघात
Comments (0)
Add Comment