जर तुम्ही उन्हाळ्यात कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर अशा परिस्थितीत योग्य माहितीअभावी प्लॅनिंग करणे कठीण होऊन बसते, जसे की पहिल्या दिवशी काय करायचे, दुसऱ्या दिवशी कुठे भेट द्यायची या आणि अशा अनेक गोष्टी आपण प्लॅनिंगमध्ये समाविष्ट करू शकत नाही. पण जर गुगलनेच तुम्हाला याकामी मदत केली तर तुमचे काम सोपे होणार आहे. एवढेच नाही तर ट्रिपमध्ये काय करावे आणि काय करू नये हेही गुगल सांगू शकते.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे प्लॅनिंग
जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे नियोजन करत असाल तर गुगल आणि त्यातील काही टूल्स तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. गुगल एआय पॉवर्ड टूलद्वारे, तुम्ही ट्रिपनुसार मुक्काम आणि सर्वोत्तम रेस्टॉरंट इत्यादींबद्दल माहिती मिळवू शकता. येथे तुम्हाला असे काही ॲप्स आणि टूल्स सांगत आहोत जे ट्रिप प्लॅनिंग आणि इतर गोष्टींसाठी खूप उपयुक्त ठरतील.
जनरेटिव्ह एआयसह ट्रीपच्या आयडीया मिळवा
नवीन ठिकाण शोधणे हा सहलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण तिथे राहायला आणि खाण्यासाठी योग्य जागा शोधायची असेल तर खूप वेळ जातो. पण हे काम गुगलच्या एआय पॉवर्ड टूलद्वारे सहज करता येते. या उन्हाळ्याच्या सुटीत तुम्ही गुगलवरून संपूर्ण दिवसाचे नियोजन देखील जाणून घेऊ शकता. फक्त यासाठी तुम्हाला ट्रिपनुसार गुगलवर एक चांगला प्रॉम्प्ट टाकावा लागेल.
ओव्हरनाईट ॲप
प्रवासादरम्यान सर्वात मोठी समस्या म्हणजे राहण्यासाठी चांगले रूम शोधणे. पण एक ॲप आहे जे तुमचे काम खूप सोपे करेल. ओव्हरनाईट ॲपच्या माध्यमातून तुम्ही 24 तास कधीही रूम्स शोधू शकता आणि चांगली गोष्ट म्हणजे हे ॲप खूप कमी वेळात रूमचे लोकेशन सांगते.
गुगलची ही टूल्स आणि ॲप्स तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरतील यामुळे सुटी घालवतांना बाहेरच्या अनोळखी ठिकाणी कोणताही त्रास होणार नाही.