जुन्या टीव्हीमधून खरोखर सोने निघते का? तोडण्यापूर्वी सत्य जाणून घ्या

सोशल मिडिया एक मुक्त माध्यम आहे यावर काहीही व्हायरल होत असते आणि लोक डोळे झाकून कशावरही विश्वास ठेवतात. यातील एक व्हायरल गोष्ट म्हणजे जुना टीव्ही तोडल्यास त्यातून सोने निघते, हे ऐकून तुमचा तरी विश्वास बसेल का? जरा कल्पना करा, जर तुम्ही टीव्ही तोडला आणि त्यातून सोने बाहेर आले तर काय होईल. खरं तर, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जुन्या टीव्हीमधून सोने बाहेर येत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ खरा मानलात तर तुम्हाला बरंच काही सोनं मिळू मिळेल, पण जर तुम्ही त्याची सत्यता पडताळून बघितले तर त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. जुन्या टीव्हीमधून सोने बाहेर येते हे ऐकताचक्षणी भाकड वाटत असले तरी सोशल मीडियावर ही स्टंटबाजी करुन लोक असंख्य लाईक्स आणि कमेंट मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या आयडिया लढवतात.

आता प्रश्न येतो की जुना बॉक्स टीव्ही तुम्हाला खरोखर श्रीमंत बनवू शकतो का. यातून खरेच सोने काढता येते का? तर पाहूया, जूना टीव्ही तोडल्यास तो काही पार्ट्समध्ये वेगळा होईल आणि पार्ट्स एकमेकांशी जोडण्यासाठी तांब्याचा वापर केला जातो . तांबे आणि सोन्याचा रंग थोडासा सारखा असतो. अशा स्थितीत व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले सोने तांबेही असू शकते.

टीव्ही, एसी आणि पंख्यामध्ये देखील तांब्याचा वापर

टीव्ही, एसी आणि पंखे यांसारख्या विजेवर चालणाऱ्या वस्तू जोडण्यासाठी तांब्याचा वापर केला जातो. कारण तांबे हा विजेचा उत्तम वाहक आहे. मुक्त इलेक्ट्रॉन धातूमध्ये फिरू शकतात आणि यामुळे विजेचा प्रवाह सुरु राहतो

इन्स्टाग्रामवर व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हातोड्याने टीव्ही तोडताना दिसत आहे, तर ती व्यक्ती सांगत आहे की, टीव्ही जेवढा जुना आहे, तेवढे त्यात सोन्याचा वापर करण्यात आला आहे. त्या व्यक्तीने टीव्हीचे सर्व पार्ट्स मोकळे केले आणि ते सोन्याचे असल्याचा दावा केला. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अनेकांनी त्याची खिल्ली उडवली तर काहींनी ती चुकीची असल्याचे सिद्ध केले.

खरं तर ते सोनं नाही, वर म्हटल्याप्रमाणे, टीव्ही, एसी सारख्या विजेवर चालणाऱ्या सर्व उत्पादनांमध्ये तांब्याचा वापर केला जातो. तांब्याचा रंग सोन्यासारखाच असतो, त्यामुळे काही लाइक्स आणि कमेंट्स गोळा करण्यासाठी ही व्यक्ती तांब्याला सोनं म्हणत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. यात कुठलेही तथ्य नाही.

Source link

gold from old tvsocial mediasocial media viral videoTV stuntviral video
Comments (0)
Add Comment