Vivo Y18e ची किंमत
Vivo Y18e विवो इंडियाच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. कंपनीनं फोनची किंमत सांगितली नाही. हा डिव्हाइस जेम ग्रीन आणि स्पेस ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येईल.
Vivo Y18e चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y18e पॉलिकार्बोनेटचा वापर करण्यात आला आहे. १८५ ग्राम वजन असलेल्या या फोनमध्ये ६.५६ इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एचडी प्लस रिजोल्यूशन आणि ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट ऑफर करतो.
Vivo Y18e मध्ये ४जीबी रॅम देण्यात आला आहे. व्हर्च्युअल रॅम फीचरच्या मदतीनं रॅम आणखी ४जीबी एक्सटेंड केला जाऊ शकतो. इंटरनल स्टाेरेज ६४ जीबी आहे. जी एसडी कार्डच्या मदतीनं वाढवण्याच्या ऑप्शन देखील या फोनमध्ये आहे. Vivo Y18e मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी८५ प्रोसेसर देण्यात आला आहे. हा लेटेस्ट अँड्रॉइड १४ वर चालतो.
Vivo Y18e मध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ०.०८ ची आणखी एक लेन्स या फोनमध्ये देण्यात आली आहे. फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. Vivo Y18e मध्ये ५००० एमएएचची बॅटरी आहे. ही १५ वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी अनेक ऑप्शन या डिव्हाइस मध्ये देण्यात आले आहेत. परंतु हा ५जी फोन नाही.
Vivo V30e कधी येणार भारतात
Vivo V30e स्मार्टफोन २ मेला भारतात लाँच होणार आहे. या फोनची किंमत ३० हजारांच्या बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते. हा फोन सिल्क ब्लू आणि व्हेल्वेट रेड कलरमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. फोनमध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले मिळेल, हा अॅमोलेड कर्व्ड पॅनल असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६ जेन १ चिपसेट मिळेल. सोबत ८जीबी रॅम आणि २५६जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळेल. हा मोबाइल फोन अँड्रॉइड १४ सह येईल. स्मार्टफोनमध्ये ५०एमपीचा कॅमेरा आणि ८एमपीचा अल्ट्रा वाइड सेन्सर आहे. फ्रंटला ३२एमपीचा कॅमेरा मिळेल.