(शैलेश चौधरी)
अखिल भारतीय मराठा महासंघांची जिल्हा कार्यकारिणी मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे,
कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख,चिटणीस प्रमोद जाधव,राष्ट्रीय युवक प्रतिनिधी अतिष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घोषित करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्षपदी प्रा.मनोज पाटील,संपर्क प्रमुखपदी सुदर्शन देशमुख,जिल्हा कार्याध्यक्षपदी चंदन पाटील,उपाध्यक्षपदी अतुल सोनवणे,उपाध्यक्षपदी राहुल पाटील, सरचिटणीसपदी दिपक पाटील, जिल्हा संघटकपदी गोपाल पाटील,युवक अध्यक्षपदी शुभम पवार,जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी मंगेश पाटील,युवक उपाध्यक्षपदी प्रल्हाद पाटील,युवक सरचिटणीसपदी पंजाब देशमुख,महानगर अध्यक्षपदी जयेश पाटील,महानगर उपाध्यक्षपदी विजय बांदल,महानगर युवक अध्यक्षपदी प्रदीप पाटील,महानगर युवक उपाध्यक्षपदी पंकज पाटील तसेच जिल्हा भरातील सर्व तालुका कार्यकारीणी घोषित करण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्यांक सावंत यांनी केले. याप्रसंगी संघटने विषयी माहिती,ध्येय,धोरणं, बैठकीचे उद्दीष्ट इ.बाबी स्पष्ट करण्यात आल्या,संघटनेची पुढील वाटचाली विषयी माहिती देण्यात आली,अध्यक्षीय मनोगतात प्रा.मनोज पाटील यांनी राष्ट्रीय कार्यकारीणीचे नियुक्तीबद्दल आभार मानले,तसेच जिल्हाभरात मराठा महासंघाच्या गाव तेथे शाखा,युवकांचे संघटन व अनेक सामाजिक उपक्रम भविष्यात करण्याविषयी चर्चा केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिनेश बाविस्कर सर यांनी केले. या जिल्हा बैठकीसाठी जिल्हा भरातील नवनियुक्त पदाधिकारी रामकृष्ण सनेर,धिरज पाटील,विश्वजीत पाटील,भुषण चौधरी,राकेश निकम,संदिप वाघ,किशोर पाटील,किरण पाटील, कल्पेश पाटील, दिपक पाटील,देवकांत पाटील, भिमराज पाटील,कैलास पाटील व जिल्हा भरातील पदाधिकारी हजर होते.