गुरपतवंतसिंग पन्नू हत्येच्या कटात ‘रॉ’ अधिकारी? वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राचा दावा

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : अमेरिकेतील शीख फुटीरतावादी नेता गुरपतवंतसिंग पन्नू यांच्या हत्येच्या कटात विक्रम यादव नावाचा ‘रॉ’चा अधिकारी सहभागी होता आणि या कारवाईला तत्कालीन भारतीय गुप्तचर संस्थेचे प्रमुख सामंत गोयल यांनी मान्यता दिली होती, असे वृत्त एका माध्यमसंस्थेने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पन्नू खलिस्तान चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी होता. भारत सरकारने पन्नूला दहशतवादी घोषित केले आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ वृत्तपत्राने याबाबत एक शोध पत्रकारितेचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ‘भारत उत्तर अमेरिकेत घातक कारवाया करेल, या भीतीने पाश्चिमात्य सुरक्षा अधिकारी हैराण झाले आहेत,’ असे या वृत्तात म्हटले आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीत चीनच्या हस्तक्षेप? पुरावे मिळाल्याचा अँटनी ब्लिंकन यांचा दावा
‘अॅमेझॉन’चे संस्थापक आणि प्रमुख अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या मालकीच्या अग्रगण्य अमेरिकन दैनिकाने दिलेल्या वृत्तनुसार, सीमेपलीकडील दडपशाहीच्या मोहिमांमध्ये जागतिक स्तरावर वाढ होत आहे. भारत आणि इतर देश यासाठी सक्रिय आहेत. भारतीय गुप्तचर खात्याचे अधिकारी यामध्ये सहभागी होत असल्याचे स्पष्ट झाले होते. पन्नू यांना लक्ष्य करणाऱ्या मोहिमेला तत्कालीन ‘रॉ’चे प्रमुख सामंत गोयल यांनी मान्यता दिली होती, असा अंदाज अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे, असा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.

Source link

gurpatwant singh pannu casegurpatwant singh pannu case updateinternational newswashington post
Comments (0)
Add Comment