कोणी बघू शकणार नाही तुमची YouTube हिस्टरी; ‘अशी’ करा डिलीट

Youtube हे जगातील आघाडीच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. आपण सर्वजण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि गाणी ऐकण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करतो. तथापि, तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणीही तुमचे अकाउंट एक्सेस करत असल्यास ते तुमची व्ह्यू हिस्ट्री सहजपणे पाहू शकतात. अशा परिस्थितीत, तुमची प्रायव्हसी राखण्यासाठी तुम्ही YouTube हिस्ट्री डिलीट करू शकता.

Android आणि iOS युजर्स याप्रमाणे YouTube हिस्ट्री डिलीट करू शकतात

  • तुमच्या डिव्हाइसवर YouTube ॲप उघडा.
  • स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात प्रोफाइल चिन्हावर क्लिक करा.
  • ‘Your data in YouTube’ ऑप्शनवर जा.
  • खाली स्क्रोल करा आणि ‘Manage your YouTube Watch History’ वर टॅप करा.
  • येथे तुम्हाला ‘डिलीट’ ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला ‘डिलीट’, ‘डिलीट कस्टम रेंज’ आणि ‘डिलीट ऑल टाइम’ पर्याय मिळतील.
  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही एक निवडून हिस्ट्री डिलीट करू शकता.

वेबसाइट व्हर्जनवरील हिस्ट्री डिलीट करण्यासाठी, या स्टेप्स फॉलो करा

  • तुमच्या कॉम्पुटरवर आणि लॅपटॉपवर YouTube ॲप उघडा.
  • तुमच्या स्क्रीनवर होमपेज उघडेल, डाव्या कोपऱ्यात असलेल्या तीन ओळींच्या ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुम्हाला हिस्ट्रीचा ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करा.
  • आता ‘क्लीअर ऑल वॉच हिस्ट्री’ या ऑप्शनवर क्लिक करा.
  • यानंतर तुमची व्ह्यू हिस्ट्री डिलीट केली जाईल.

YouTube चे ऑटो-डिलीट फीचर

  • YouTube मध्ये एक ऑटो-डिलीट फीचर देखील आहे, जे निर्धारित वेळेवर हिस्टरी ऑटोमॅटिकली डिलीट करते. जर तुमच्याकडे दरवेळी हिस्ट्री डिलीट करण्यासाठी वेळ नसेल, तर तुम्ही हे फीचर वापरू शकता. फीचर ॲक्टिव्ह करण्यासाठी, खालील स्टेप्स फॉलो करा.
  • तुमच्या मोबाईलवर YouTube ॲप उघडा.
  • उजव्या कोपऱ्यात प्रोफाइल चिन्हावर क्लिक करा.
  • आता ‘You Data in YouTube’ या ऑप्शनवर क्लिक करा.
  • खाली स्क्रोल करा आणि ‘Manage your YouTube Watch History’ ऑप्शनवर टॅप करा.
  • येथे तुम्हाला ऑटो-डिलीट ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • यानंतर कालावधी निवडा आणि पुढे जा.
  • Next बटणावर क्लिक करा.
  • आता हे फीचर ॲक्टिव्ह होईल आणि नियोजित वेळेवर हिस्ट्री ऑटोमॅटिकली डिलीट होईल.

YouTube पार्टनर प्रोग्रॅम

यूट्यूबने नुकताच हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, कमाईचे धोरण लक्षणीयरीत्या शिथिल करण्यात आले आहे.कन्टेन्ट प्रोड्युसर किंवा क्रिएटर्स 500मेम्बर्स , 3000 तास वॉच टाईम, 90 दिवसात 3 व्हिडिओ आणि 3 दशलक्ष व्हयूजसह पैसे कमवू शकतात. कंपनीचा विश्वास आहे की, यामुळे क्रिएटर्सना अधिक चांगले कन्टेन्ट तयार करण्यास प्रोत्साहन मिळेल.

Source link

android and ios usersvideo streamingyoutubeअँड्रॉइड आणि आयओएस युजर्सयुट्यूबव्हिडीओ स्ट्रीमिंग
Comments (0)
Add Comment