हायलाइट्स:
- शिवसेना खासदार संजय राऊत यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा.
- बारामतीही आपलीच आहे, आपण जिंकू शकतो- संजय राऊत.
- कदाचित आपण निवडणूक जिंकणार नाही, पण संघटनेची ताकद तर वाढायला हवी- राऊत.
भोसरी (पुणे): शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी महापालिका निवडणुकांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सूचक इशारा दिला आहे. अजित पवार ऐकले नाहीत तर त्यांना सांगावे लागेल. मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत, असे वक्तव्य करत एकत्र आले तर ठीक, नाहीतर एकटे लढण्याची सगळ्या उमेदवारांची तयारी करू असे भोसरी येथील कार्यक्रमात जाहीर केले आहे. त्यानंतर राऊत यांनी आपला मोर्चा बारामतीकडे (Baramati) वळवत बारामतीही आपण जिंकू शकतो, असे वक्तव्य केले आहे. बारामती जिंकण्याचा संकल्प सोडत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (shiv sena leader sanjay raut said that we wants to win baramati)
राऊत म्हणाले, ‘आपण जिंकू शकतो’
भोसरी येथे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिक पदाधिकाऱ्यांमध्ये जिंकण्यासाठी सकारात्मक ऊर्जा भरण्याचे काम केले. राऊत आपल्या भाषणात म्हणाले, ‘लहानसहान गोष्टीही आपण जिंकत गेलो पाहिजे. आपल्याला जिंकण्याची नशा पाहिजे. जिंकण्याची सवय पाहिजे. आणि जे व्हा ती आपल्या धमन्यांमध्ये येईल, तेव्हा हा पक्ष आज आहे त्या पेक्षा शंभर पावलं पुढं निघून गेलेला असेल. इथे बारामतीचीही लोकं आहेत. तुम्ही असं का गृहीत धरता की बारामतीला आपलं काहीच नाही? बारामतीपण आपलीच आहे. महाराष्ट्राचा भाग आहे. संघटना वाढत राहिली पाहिजे. कदाचित आपण निवडणूक जिंकणार नाही, संघटनेची ताकद तर वाढायला हवी! ती जेव्हा वाढेल… अनेक वर्षं… आता पुरंदरलाही इतकी वर्षे आपला विजय होत होता. कधी वाटलं होतं का की पुरंदरला आम्ही जिंकू?, पुरंदर हा बारामतीतलाच भाग आहे. जिंकू शकतो आपण. आपण जिंकू शकतो, आम्ही करू शकतो ही सकारात्मक भावना असली पाहिजे.’
क्लिक करा आणि वाचा- अजित पवारांनी ऐकले नाही तर त्यांना सांगावे लागेल; राऊत यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा
मी जेव्हा म्हणायचो की मुख्यमंत्री आमचा होईल, तेव्हा लोक वेड्यात काढायचे. निवडणुकीचे निकाल लागत असताना मी जेव्हा पहिल्याच दिवशी शिवसेना भवनाच्या बाहेर येऊन बोललो की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत. सर्व मीडियाचे प्रतिनिधी होते. त्यानंतर पुढचे ३२ दिवस मी तेच सांगत होतो. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली. तेव्हा लोकांनी आशा सोडली. राष्ट्रपती राजवट लागली याचा अर्थ आमचेच सरकार येणार असे मी म्हणालो. माणसाला राजकारणामुळे कायम जिंकण्याची नशा पाहिजे. आणि बाळासाहेब ठाकरेंमुळे मला जिंकण्याची नशा लागली. ज्याला मी हात लावीन तिथे मला विजय मिळाला पाहिजे.
क्लिक करा आणि वाचा- दिलासा! राज्यात आज करोनाच्या मृत्यूसंख्येत मोठी घट; नवे रुग्णही झाले कमी
शिवसेना आग आहे, आमच्या वाट्याला जाऊ नका- राऊत
आपल्या भाषणात राऊत यांनी पक्षविस्तारावर भर दिला. शिवसेना आग आहे शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, असे सांगतानाच मी एकच सांगतो, उद्धव ठाकरे देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनले आहेत. तसा पक्षही पहिल्या क्रमांकाचा व्हावा, ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांना आपल्या संघटनेत स्थान द्या, असेही राऊत यांनी सांगितले. शिवसेनेत सर्वात मोठे पद हे शिवसैनिकाचेच आहे. कोणतेही पद न स्वीकारता बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधीश होते. मंत्री, आमदार, खासदार हे काही महत्त्वाचे नाही. पक्ष महत्त्वाचा आहे,असे ही राऊत म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- मुंबईचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार