माहितीच्या अधिकारात माहिती मागीतल्याच्या रागातून धमकी..

जळगाव: रेशन दुकानाचा तपशिल माहितीच्या अधिकारात अर्जाद्वारे मागणा-या अर्जदारास धमकावणा-या दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी हुसेन हसन खान (रा. तांबापुरा,जळगाव) असे तक्रारदाराचे नाव तर रमजान मुल्तानी व फरीद मुल्तानी असे विरुद्ध पक्षातील दोघांची नावे आहेत.
रेशन दुकानाचा परवाना रद्द झाल्यानंतर दुस-या व्यक्तीकडे गेलेल्या परवान्याबाबतची माहिती अर्जदार हुसेन हसन खान यांनी माहितीच्या अधिकारात मागवली होती.त्याचा राग आल्याने रमजान मुल्तानी व फरीद मुल्तानी या दोघांनी हुसेन हसन खान यांस जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी येथील रामानंद नगर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments (0)
Add Comment