या माहितीच्या आधारे हे स्कॅमर्स अनेक प्रकारे फसवणूक करतात. आजकाल तर आधार कार्डाच्या माध्यमातून देखील फसवणुकीची प्रकरणं समोर आली आहेत. यात स्कॅमर्स तोतया पोलीस अधिकारी म्हणून कॉल करतात व कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत नागरिकांची फसवणूक करतात.
स्कॅमरना तुमचा डेटा कोठून मिळतो?
स्कॅमर्स ला सामान्य व्यक्तीबद्दल इतके डिटेल्स कुठून मिळतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्ही घरी निवांत बसून टीव्ही पाहत असाल आणि कोणीतरी तुम्हाला कॉल करते आणि तुम्ही कुठलाही विचार करण्याआधीच पुढची व्यक्ती तुम्हाला अधिकाऱ्याच्या नावाने धमकावू लागते. स्कॅमर्स कायदेशीर कारवाईची धमकीही देतात. यानंतर तुम्हाला वरिष्ठांशी बोलण्यास सांगितले जाऊ शकते. या सगळ्याचा उद्देश तुम्हाला घाबरवून पैसे गोळा करणे हा आहे, पण मग प्रश्न असा पडतो की स्कॅमर्सला तुमची माहिती कोठून मिळाली?
डेटा लीक
पहिले कारण काही डेटा लीक असू शकते. सर्व युजर्सचाचा डेटा डार्क वेबवर अनअधिकृतरित्या विकला जातो. हा डेटा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून लीक होऊ शकतो. यात यूजरची सर्व प्रायव्हेट माहिती असते. उदाहरणार्थ, तुमचा फोन नंबर, आधार कार्ड नंबर
फोन कॉल स्कॅम
युजरचे डिटेल्स मिळविण्यासाठी, स्कॅमर्स अनेकदा बँक कर्मचारी किंवा इतर काही सेवेचे अधिकारी म्हणून कॉल करतात. मग युजर्सला त्यांच्या आमिष दाखवून, स्कॅमर्स त्यांचे सर्व डिटेल्स मिळवतात.
जर तुमचा वैयक्ति डेटा लीक लीक झाला असेल, तर स्कॅमरकडे तुमची सर्व माहिती असू शकते. त्यामुळे दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने तुमचे पासवर्ड बदलत राहावे असा सल्ला दिला जातो. याशिवाय सोशल मीडियावर फोटो आणि इतर तपशील शेअर करताना काही सावधगिरी बाळगली पाहिजे.
जसे की, तुमचा वाढदिवस कधी असतो हे खाजगी ठेवा आणि सार्वजनिक मीडियावर त्याबद्दल माहिती देऊ नका. याशिवाय तुमचे आधार कार्ड किंवा क्रेडिट कार्ड फोटोंमध्ये दिसू नये आणि इतर गोष्टीही लक्षात ठेवा. कोणत्याही वेबसाइटला भेट देताना, तिची URL नक्कीच तपासा. असे होऊ शकते की तुम्ही तुमचे सर्व तपशील बनावट वेबसाइटवर शेअर कराल.