आजचे पंचांग 1 मे 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति वैशाख ११, शक संवत १९४६, वैशाख कृष्ण अष्टमी, बुधवार, विक्रम संवत २०८१ सौर वैशाख मास प्रविष्टे १९, शव्वाल २१, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १ मे २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, अष्टमी तिथी दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २० मिनिटांपर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ

श्रवण नक्षत्र मध्यरात्री ३ वाजून ११ वाजेपर्यंत त्याननंतर धनिष्ठा नक्षत्र प्रारंभ, शुभयोग रात्री ८ वाजून १ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुक्ल योग प्रारंभ, बालव करण संध्याकाळी ४ वाजून ५४ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ, चंद्र दिवस-रात्र मकर राशीत भ्रमण करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-१२
  • सूर्यास्त: सायं. ७-००
  • चंद्रोदय: उत्तररात्री १-५०
  • चंद्रास्त: दुपारी १२-१७

  • पूर्ण भरती: पहाटे ४-१० पाण्याची उंची ३.०८ मीटर, सायं. ५-४५ पाण्याची उंची ३.७० मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी १०-२२ पाण्याची उंची १.३६ मीटर, रात्री १२-२६ पाण्याची उंची २.२५ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १४ मिनिटे ते ४ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांपासून ते ७ वाजून १७ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून १९ मिनिटांपासून ते ८ वाजून ५८ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – शमीच्या झाडाची २१ पाने गणरायाला अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

1 May 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment