POCO F6 गीकबेंच लिस्टिंग
24069PC21G या मॉडेल नंबरसह एक पोको फोन गीकबेंच प्लॅटफॉर्मवर दिसला आहे, हा POCO F6 असल्याची चर्चा आहे. मॉडेल नंबरमधील शेवटचं G अक्षर हा ग्लोबल व्हेरिएंट असल्याचं दर्शवतो. या फोनला गीकबेंच लिस्टिंगनुसार सिंगल-कोर राउंड मध्ये १८८४ आणि मल्टी-कोर राउंड मध्ये ४७९९ पॉईंट्स मिळाले आहेत.
गीकबेंच वेबसाइटवर फोनच्या मदरबोर्ड सेक्शन मध्ये ‘पेरिडॉट’ चा उल्लेख आहे. तसेच ३.०१ गिगाहर्टझ क्लॉक स्पीड असलेला स्नॅपड्रॅगन ८एस जेन ३ चिपसेट आहे. डिवाइस १२ जीबी पर्यंत रॅमसह येईल, असं सांगण्यात आलं आहे. परंतु लाँचच्या वेळी आणखी रॅम ऑप्शन मिळू शकतात. लिस्टिंगनुसार फोन अँड्रॉइड १४ ओएसवर चालेल.
POCO F6 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
POCO F6 मध्ये ६.६७-इंचाचा १.५K रिजॉल्यूशन असलेला अॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, २,१६०हर्ट्झ पीडब्लूएम डीमींग, २,४०० निट्स पीक आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन मिळू शकतं. हा डिव्हाइस इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, इन्फ्रारेड सेन्सर, हाय-रेज ऑडियो, स्टीरियो स्पिकर, डॉल्बी अॅटमॉस आणि पाणी आणि धुळीपासून सुरक्षा करण्यासाठी आयपी६४ रेटिंग मिळू शकते.
फोनमध्ये ब्रँड दमदार परफॉर्मन्ससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८एस जेन ३ चिपसेट दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी एड्रेनो जीपीयू दिला जाऊ शकतो. डेटा सेव्ह करण्यासाठी मोबाइल १२जीबी किंवा १६जीबी पर्यंत एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि १टीबी पर्यंत यूएफएस ४.० इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
POCO F6 मध्ये OIS सह ५०एमपीचा प्रायमरी सोनी सेन्सर आणि ८एमपीची अल्ट्रावाइड लेन्स मिळू शकते. तसेच, सेल्फीसाठी २०एमपीची लेन्स दिली जाऊ शकते. हा आगामी पोको फोन ५०००एमएएच बॅटरीसह बाजारात येऊ शकतो, यात कंपनी ९०वॉट वायर्ड चार्जिंगचा सपोर्ट देऊ शकते.